पोलिसानेच केला महिला पोलिसांवर जीवघेणा हल्लाखाकी विरुद्ध खाकी

ताज्या घडामोडी महाराष्ट्र

मागील गुन्ह्याच्या कारणावरून जीवघेणा हल्ला

बार्शी दि (तालुका प्रतिनिधी) मागील गुन्ह्याच्या कारणावरून एका पोलिसानेच महिला पोलिसांवर प्राणघातक हल्ला केला असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे याप्रकरणी चार अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहेअधिक माहिती अशी की बार्शी डीवायएसपी कार्यालयातील महिला पोलीस कर्मचारी रेश्मा सुतार या दि ७ जानेवारी सायंकाळी साडेसहा वाजता ड्युटी करून साकत पिंपरी या गावी जाण्यासाठी स्कुटी वरून निघाल्या असता त्यांची स्कुटी तुळजापूर रोडवरील शेलगाव च्या पुढे गेल्यावर पाठीमागून एका मोटारसायकलवर दोघेजण आले त्यांनी डाव्या बाजूने मोटारसायकल जवळ आली असता पाठीमागे बसलेल्या इसमाने फिर्यादी च्या स्कुटीला जोरदार लाथ घातली त्यामुळे फिर्यादी गाडी सह खाली पडली फिर्यादीचा उजवा पाय स्कुटीच्या खाली अडकला तर उजव्या हाताला ही मार लागला त्यावेळी मोटारसायकलवर पाठीमागे बसलेला इसम म्हणाला की माझ्यावर गुन्हा दाखल करतेस का,कर तर पुढे बसलेला इसम म्हणाला की माझा मेव्हणा डोळस वर गुन्हा दाखल करते का असे म्हणून त्यांची मोटारसायकल तुळजापूर रोडने गेली त्यांच्या पाठोपाठ  दुसऱ्या मोटारसायकलवर अन्य दोघेजण आले आणि आज तू कशी घरापर्यंत जाते तेच बघतो असे म्हणून हातातील धारदार शस्त्राने फिर्यादी च्या डोक्यात वार करण्याचा प्रयत्न केला फिर्यादीने तो वार चुकवला तेवढ्यात पाठीमागून इतर वाहने आल्याने मारेकरी पसार झाले या सर्व आरोपींनी तोंडाला मास्क,रुमाल बांधलेले असल्याने व अंधार पडायला लागला होता त्यामुळे आरोपी, त्यांचे कपडे आणि मोटारसायकल नंबर बाबतीत सविस्तर वर्णन करता आले नाही मात्र यापैकी एकाचा आवाज हा वैराग पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या उमेश डोळस याच्या सारखा असल्याचे सांगितले आहे तर सुतार याच्या विरोधात या पूर्वी ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे  याबाबत रेश्मा सुतार यांच्या फिर्यादीवरून भा द वि ३०७ ५०४,३४ प्रमाणे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास सपोनि शिवाजी जयंपात्रे करत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *