PM शेतकरी सन्मान योजनेमध्ये 110 कोटींचा घोटाळा

ताज्या घडामोडी देशविदेश

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या सर्वात मोठ्या योजनेमध्ये घोटाळा समोर आला आहे. पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेमध्ये काही अशा लोकांबाबत माहिती समोर आली आहे, जे या योजनेसाठी पात्र नसून देखील योजनेचा लाभ घेत होते. तामिळनाडू सरकारनेगरीबांना लाभ देणाऱ्या या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेमध्ये 110 कोटी रुपयांपेक्षा जास्त मोठा घोटाळा झाल्याचा खुलासा केला आहे. या प्रकरणाच्या तपासात असे समोर आले आहे की, फसवणूक करून 110 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम ऑनलाइन पद्धतीने काढण्यात आली आहे. इंडियन एक्सप्रेसच्या अहवालानुसार या प्रकरणात आतापर्यंत 18 जणांना अटक करण्यात आली आहे.

तामिळनाडूचे मुख्य सचिव गगनदीप सिंह बेदी असे म्हणाले की,  या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या असामान्यपणे वाढली असल्याचे ऑगस्टमध्ये पहिल्यांदा त्यांच्या लक्षात आले. एकूण 13 जिल्ह्यात अशाप्रकारे घोटाळा झाला आहे.बेदी म्हणाले की, एजंट किंवा दलाल असलेल्या 18 लोकांना अटक करण्यात आली आहे. तर कृषी योजनेशी संबंधित 80 अधिकारी बरखास्त करण्यात आले असून  34 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *