PM Kisan Scheme: 25 दिवसानंतर तुमच्या खात्यात येणार 2000 रुपये

ताज्या घडामोडी देशविदेश

नवी दिल्ली: मोदी सरकार शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत  (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi scheme) शेतीसाठी तुमच्या खात्यामध्ये 2000 रुपयांचा पुढील हप्ता पाठवण्याच्या तयारीत आहे. या योजनेअंतर्गत पाठवण्यात येणारा सातवा हप्ता 1 डिसेंबरपासून सुरू होत आहे. या योजनेअंतर्गत विविध टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांना तीन हप्त्यात प्रत्येकी 2 हजार असे 6 हजार रुपये पाठवले जातात. आतापर्यंत 6 टप्प्यात शेतकऱ्यांना हप्ते पाठवण्यात आले आहेत. गेल्या 23 महिन्यात केंद्राने 11.17 कोटी शेतकऱ्यांना 95 कोटींची मदत केली आहे.

पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकार ज्या तीन हप्त्यात पैसे देते, त्यातील पहिला हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान देण्यात येतो. दुसरा 1 एप्रिल ते 31 जुलै तर तिसरा 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर. जर कागदपत्र योग्य असतील तर तुम्हाला यावेळी पाठवण्यात येणाऱ्या हप्त्याचा देखील लाभ मिळेल. त्यामुळे तुम्ही दिलेली माहिती तपासून पाहा, जेणेकरून पैसे मिळण्यास कोणतीही समस्या येणार नाही. जर तुमच्या वैयक्तिक किंवा बँकिंग डिटेल्समध्ये गडबड असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही.

कृषी मंत्रालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 1.3 कोटी शेतकऱ्यांना यामुळेच फायदा मिळालेला नाही. रेकॉर्डमध्ये गडबड असल्यामुळे किंवा आधार कार्ड अपडेट नसल्यामुळे त्यांना पैसे मिळाले नाहीत. काहींच्या नावाचे स्पेलिंग देखील चुकीचे आहे.

कसा तपासाल तुमचा रेकॉर्ड?

-पीएम शेतकरी सन्मान निधीच्या pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन लाग इन करा. त्यामध्ये देण्यात आलेल्या फार्मर्स कॉर्नरवर क्लिक करा

-तुम्ही या योजनेकरता अर्ज केला आहे किंवा आधार कार्ड क्रमांक अपलोड झाला नाही आहे किंवा कोणत्याही कारणामुळे क्रमांक चुकीचा दाखल झाला असेल, तर याबाबतची माहिती तिथे मिळेल.

-या टॅबमध्ये तुम्ही योजनेसाठी रजिस्टर देखील करू शकता

-याठिकाणी सरकार लाभार्थ्यांची पूर्ण यादी देखील अपलोड करते. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती काय आहे हे आधार, बँक डिटेल्स  आणि मोबाइल नंबरच्या साहाय्याने माहित करुन घेऊ शकता

थेट करा कृषी मंत्रालयाशी संपर्क

या योजनेबाबत तुम्हाला जर काही समस्या किंवा प्रश्न असतील तर तुम्ही कृषी मंत्रालयाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करू शकता.

पीएम शेतकरी सन्मान टोल फ्री नंबर: 18001155266

पीएम शेतकरी सन्मान हेल्पलाइन नंबर:155261

पीएम शेतकरी सन्मान लँडलाइन नंबर्स: 011—23381092, 23382401

पीएम शेतकरी सन्मानची नवी हेल्पलाइन: 011-24300606

पीएम शेतकरी सन्मानची आणखी एक हेल्पलाइन आहे: 0120-6025109

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *