विनामास्क कारवाई ; एक लाख २५ हजारांचा दंड वसूल

ताज्या घडामोडी सोलापूर

सोलापूर (प्रतिनिधी) कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन प्रशासनाने एकीकडे दोन-दोन मास्क परिधान करावे असे सांगत आहे.दुसरीकडे काही नागरिक हे विनामास्कने बाहेर फिरताना आढळत आहेत.नागरिकांवर प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई केळी जात आहे.अशा विनामास्क फिरणाऱ्या २५१ जणांकडून एक लाख २५ हजार ५०० रुपयांचा दंड पोलिसांनी वसूल केला.कोरोना या सांसर्गिक रोगाच्या अनुषंगाने प्रशासनाच्यावतीने शाररिक अंतर पाळावे,सोबतच मास्क वापरावा व.दुचाकीवर आसन क्षमतेच्या एकालाच परवानगी देण्यात आलेली आहे.प्रशासनाच्या या आदेशाकडे काही नागरिक सर्रासपणे दुर्लक्ष करत आहेत.यामुळे अशांवर दंडात्मक कारवाई केळी जात आहे.शहर पोलीस हद्दीतील सात पोलीस स्टेशनमध्ये कारवाई करण्यात येत आहे.यात २५१ विनामास्क नागरिकांवर कारवाई करण्यात आली.तसेच १ आस्थापनांवर कारवाई करत २ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ३७१ वाहनांवरही दंडात्मक कारवाई करत ७६ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *