कंपनी बंद झाली PF अडकला, मग कसे मिळवायचे पैसे वापरा….

ताज्या घडामोडी देशविदेश

मुंबई, 24 ऑगस्ट : अनेकदा संस्थेसोबत काम करताना आपलं PF खातं तयार केलं जातं कालांतरानं कंपनी बंद होते आणि आपल्या PF खात्यातील पैसेही अडकतात. अशावेळी बऱ्याचदा नवीन PF खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यासाठीही अनेक समस्या निर्माण होतात. मग आपले अडकलेले पैसे कसे पुन्हा मिळवायचे यासाठी नेमकं काय करायला हवं जाणून घ्या.

PF खातं केव्हा बंद होतं?

आपण ज्या कंपनीत काम करत होतात ती बंद झाली असेल अथवा नवीन कंपनीत पैसे ट्रान्सफर केले नसतील किंवा 36 महिन्यांपेक्षा अधिक महिन्यापर्यंत कोणताही व्यवहार झाला अनेस तर आपलं PF खातं बंद होतं. EPFO अशी खाती निष्क्रिय प्रकारात ठेवतात. खातं बंद असताना खात्यातून पैसे काढणे देखील अवघड आहे. यासाठी खाते सक्रिय ठेवण्यासाठी ईपीएफओशी संपर्क साधावा लागेल. निष्क्रिय झाल्यानंतरही खात्यात पडून असलेल्या पैशांवर व्याज दिलं जात आहे.

बँकेच्या मदतीनं काढू शकता पैसे

जर आपली जुनी कंपनी बंद असेल आणि आपण नवीन कंपनी खात्यात आपले पैसे हस्तांतरित केले नाही किंवा 36 महिन्यांपर्यंत या खात्यात कोणताही व्यवहार नसेल तर 3 वर्षानंतर हे खाते आपोआप बंद होईल आणि ईपीएफच्या निष्क्रिय खात्यांशी कनेक्ट केले जाईल. बँकेच्या मदतीने तुम्ही केवायसीमार्फत पैसे काढू शकता.

कंपनी बंद झाल्यानंतर कंपनीचे प्रमाणपत्र कसे मिळवायचे –

ईपीएफओने आपल्या एका परिपत्रकात यासंदर्भात माहिती दिली आहे. फसवणूक होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली जाते. दावेदारानं सर्व कागदपत्र सादर करणं आवश्यक असतं. बंद झालेल्या खात्यातून पैसे काढण्यासाठी बँकेची केवायसी, कंपनीची कागदपत्र सादर करणं गरजेचं आहे. यामध्ये कागदपत्र पूर्ण नसतील तर पैसे मिळवण्यात अडथळा निर्माण होऊ शकतो.

कोणती कागदपत्र आहेत महत्त्वाची?

पॅनकार्ड, आधारकार्ड, मतदानकार्ड, पासपोर्ट, रेशनकार्ड, ईएसआई आइडेंटिटी कार्ड, ड्राइविंग लायसन्स यासोबत कंपनी बंद असल्याचे अथवा कंपनी सोडल्याचे कागदपत्र असणं गरजेचं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *