खडसेंच्या पक्षप्रवेशानंतर शरद पवारांची मंत्रिमंडळाच्या बदलाबाबत पहिली प्रतिक्रिया; केला मोठा खुलासा

ताज्या घडामोडी मुंबई

मुंबई : आज उत्तर महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी खडसेंनी त्यांच्यासोबत पक्षात होत असलेल्या वागणुकीवर भाष्य केले आणि पुढील काही वर्षांत राष्ट्रवादीला अधिक यशस्वी करण्याचं वचन शरद पवारांना दिलं. दरम्यान एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशानंतर मंत्रिमंडळात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. यामध्ये अनेक नेते अस्वस्थ असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. मात्र या चर्चेवर आता पूर्णविराम लागला आहे.

आज खडसेंंच्या पक्षप्रवेशादरम्यान शरद पवारांनी मंत्रिमंडळात कोणतेही बदल होणार असल्याचा मोठा खुलासा यावेळी केला. खडसे राष्ट्रवादीत आले असले तरी त्यांना अद्याप कोणतेही पद देण्यात आलेले नाही. याशिवाय या पक्षप्रवेशादरम्यान स्वत: एकनाथ खडसे यांनी कोणत्याही पदाची अपेक्षा नसल्याची भावना व्यक्त केली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम लागला आहे.

काय म्हणाले शरद पवार?

खडसेंच्या पक्षप्रवेशानंतरही मंत्रिमंडळात कोणताही बदल केला जाणार नाही. सगळेजणं आहे त्या ठिकाणी आहेत आणि राहतील. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीला मोठा फायदा होईल. एकनाथ खडसे यांनी एकदा शब्द दिला म्हणजे तो शब्द खरा केल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे आता काहीही काळजीचं कारण नाही. खडसे यांनी जाहीरपणे शब्द दिलेला आहे असं सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकनाथ खडसे यांचं कौतुक केलं. काही लोक अजित पवार नाराज आहेत अशी चर्चा करत आहे त्यावरही पवारांनी टीका केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *