3 दिवस राज्यात जोरदार पाऊस; पुण्यासह 7 जिल्ह्यांना हाय अलर्ट

0
75

पुणे : ऑगस्ट महिन्यात सुरुवातीला दोन आठवडे दडी मारल्यानंतर आता राज्यात मान्सूनसाठी पोषक हवामान तयार झालं आहे. मागील तीन चार दिवसांपासून राज्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी  कोसळल्या आहेत. आज कोकणासह मराठवाडा आणि विदर्भात जोरदार  पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हीच स्थिती पुढील तीन दिवस राहणार असल्याची माहिती मुंबई वेधशाळेकडून देण्यात आली आहे.आज राज्यात कोकण, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी येलो अर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात विजांच्या कडकडाटासह वेगवान वाऱ्याच्या साथीनं पाऊस कोसळणार आहे. मागील जवळपास तीन आठवड्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. हीच स्थिती पुढील तीन दिवस कायम राहणार आहे. मराठवाड्यातील बहुतांशी जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक राहणार आहे.कुलाबा वेधशाळेच्या शुभांगी भुत्ते यांनी सांगितलं की, राज्यात पुढील तीन ते चार दिवस कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. सध्या पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पावसाची स्थिती  निर्माण झाली आहे. याचाच एक भाग म्हणून पुढील तीन चार दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहेत. तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता ही भुत्ते यांनी वर्तवली आहे.धवारी पुण्यासह सातारा, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, जालना आणि यवतमाळ या सात जिल्ह्यांना हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट (Orange alert) जारी केला आहे. संबंधित जिल्ह्यांत अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहेत. तर तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पाऊस कोसळणार आहे. मागील काही दिवसांपासून मराठवाड्यातील शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची आस लागली होती. त्यानंतर आता राज्यात मान्सूनसाठी पोषक हवामान तयार झालं असून शेतकऱ्यांच्या चिंता दूर झाल्या आहेत.