विकेंडनंतर राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस

0
126

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मान्सूनसाठी  अनुकूल हवामान नसल्यानं पावसानं दडी मारली आहे. पुढील आणखी  तीन चार दिवस राज्यात उघडीप राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र राज्यात मान्सूनची वापसी  होण्याची शक्यता आहे. चालू आठवड्यात विकेंडनंतर राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता  हवामान खात्याकडून  वर्तवण्यात आली आहे. राज्यातील जवळपास 16 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्टजारी केला आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, विकेंडनंतर सोमवारी, 16 ऑगस्ट रोजी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, लातूर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोदिंया या जिल्ह्यांत विजांच्या कडकडासह वेगवान वाऱ्याच्या साथीनं जोरदार पावसाची शक्यता आहे. संबंधित जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी केला आहे. तर याच दिवशी पुणे, अहमदनगर, औरंगाबाद आणि जालना या चार जिल्ह्यांत विजांचा कडकडाट होणार आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here