पत्नीच्या मृत्यूनंतर दोन तासात पतीचाही मृत्यू

सोलापूर

सोलापूर : मृत्यू कोणालाही चुकला नाही, नव्हे ते चुकवताही येत नाही. अशाच तीन मृत्यूच्या घटना अडीच हजार लोकसंख्या असलेल्या मुंगशी (वा) (ता. बार्शी) येथे घडल्या. केवळ दहा तासात तिघांचा मृत्यू झाला. गोरख बनसोडे, भागिरथी पवार व निवृत्ती पवार असे निधन झालेल्या जेष्ठांची नावे आहेत. यामध्ये पत्नीच्या मृत्यूनंतर दोन तासात पतीचाही मृत्यू झाला. तिघांचा मृत्यू वृद्धापकाळाने झाल्याने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे. 
मंगळवारी रात्री गोरख सखाराम बनसोडे यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. ते 86 वर्षाचे होते. त्यांच्या पश्‍चात्य पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. तर पहाटेच्या सुमारास गावातीलच भागिरथी निवृत्ती पवार यांचे वृद्धापकाने निधन झाले. त्या 96 वर्षाच्या होत्या. त्यांच्या निधनानंतर केवळ दोन तासांनी त्यांचे पती निवृत्ती पवार यांचीही प्राणज्योत मालवली. ते 108 वर्षांचे होते. एकाच वेळी पती-पत्नी यांचे निधन झाल्याने सर्वत्र शोक निर्माण झाला. या दोघांवर शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. गावात तीन जेष्ठ व्यक्तींचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोकाकूल वातावरण निर्माण झाले आहे. 

मुंगशी (ता. बार्शी) येथे केवळ दहा तासात तिघांचा मृत्यू झाला. गोरख बनसोडे, भागिरथी पवार व निवृत्ती पवार अशी मृत्यू झालेल्या जेष्ठांची नावे आहेत. यामध्ये पत्नीच्या मृत्यूनंतर दोन तासात पतीचाही मृत्यू झाला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *