मुंबई : रुग्णालयांनी दाखल करुन घेण्यास नकार दिल्याने मुंबईत 43 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मुंबईत घडली आहे. महिलेचा पती रिक्षातून घेऊन रुग्णालयांमध्ये धावधाव करत होता. पण चार रुग्णालयांनी करोना रिपोर्ट नसल्याने त्यांना दाखल करुन घेण्यास नकार दिला. अखेर सायन रुग्णालयात महिलेचा मृत्यू झाला.
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ही माहिती दिली आहे. किरीट सोमय्या यांनी प्रशासनाच्या कारभारावर प्रश्चचिन्ह उपस्थित केलं असून मृत्यूला जबाबदार कोण? अशी विचारणा केली आहे.सुषमा भेलेकर असं या महिलेचं नाव आहे. किरीट सोमय्या यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुषमा यांचे पती अनिल रविवारी त्यांना रिक्षातून मिठागर, सावरकर आणि डॉ आंबेडकर हॉस्पिटलला गेले होते. पण रुग्णालयांनी करोना रिपोर्ट नसल्याने त्यांना दाखल करुन घेण्यास नकार दिला. अखेर रात्री 8 वाजता त्यांना सायन रुग्णालयाने दाखल करुन घेतलं. यावेळी डॉक्टरांनी करोनामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचं घोषित केलं. सुषमा भेलेकर आपल्या कुटुंबासोबत भांडूप गावात वास्तव्यास होत्या.किरीट सोमय्या यांनी प्रशासनाच्या कारभारावर प्रश्चचिन्ह उपस्थित केलं आहे. सोबतच सुषमा यांच्या मृत्यूला जबाबदार कोण? अशी विचारणा केली आहे.