बापाला हवा मुलगा; बाळाचे लिंग पाहण्यासाठी गर्भवती पत्नीचं पोटच कापलं

क्राईम ताज्या घडामोडी देशविदेश

लखनऊ : देशातील एक अत्यंत भयंकर घटना समोर आली आहे. स्त्री-पुरुष समानतेसाठी विविध योजना राबविणाऱ्या आपल्या देशात आजही असा प्रकार घडणे हे अत्यंत लज्जास्पद आहे. उत्तर प्रदेशातील या घटनेबाबत ऐकल्यानंतर मनस्ताप होईल. उत्तर प्रदेशातील पाच मुलींच्या बापाने अत्यंत दृष्कृत्य केलं आहे.

मुली या मुलांसोबत खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत, असं आपण म्हणत असतो तरी देशात आजही मुलगा हवाच असतो. याच विचारातून या 5 मुलीच्या बापाने आपल्या गर्भवती पत्नीसोबत अत्यंत हीन अशी वागणूक केली आहे. सध्या ही गर्भवती गंभीर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

या बापाने आपल्या गर्भवती पत्नीला मुलगा होईल की नाही हे तपासण्यासाठी पत्नीचं पोट कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोटीतील बाळाचं लिंग पाहण्यासाठी त्याने पत्नीच पोट फाडण्याचा प्रयत्न केला. पन्नालालने यासाठी धारदार शस्त्राने आपल्या पत्नीचे पोट कापले. यानंतर महिलेची प्रकृती अत्यंत गंभीर आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रवीण सिंह चौहान यांनी दिली. या आरोपीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आले असून त्याला अटक करण्यात आली आहे.या प्रकारानंतर महिलेला तातडीने बरेली रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. तिची प्रकृती गंभीर आहे. पन्नालाल याला मुलीची अपेक्षा होती. याआधी त्याला 5 मुली आहे. आता मुलगा आहे की मुलगी हे पाहण्यासाठी त्याने धारदार शस्त्राने पत्नीचं पोट कापलं. ही महिला 6 ते 7 महिन्यांची गर्भवती आहे. देशाने विकासाचे अनेक टप्पे पार केले आहेत. मात्र असे असताना स्त्री-पुरुष समानता ही केवळ मूल्यशिक्षणापुरती सीमित आहे की काय? असे वाटायला लागते. देशात वारंवार अशा प्रकारच्या घटना समोर येत आहे. बलात्काराबरोबर या काळातही स्त्री-भृणहत्येसारखे प्रकार होणं हे देशाच्या प्रगती वाळवी लागण्यासारखे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *