भंडारकवठे ( राजकुमार वारे ) मानव जातीला किरकोळ कारणामुळे संसाराची बंधन तुटते वर्षानुवर्ष सुन माहेरी राहुन शेवट न्यायालयात घटस्पोट घटना घडतात . अशीच एक पोपटाची सत्य घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील बंकलगीचीपोपट मैना लॉकडाऊन मध्ये गेली होती . ती पुन्हा घरी परतली अशीच एक सत्य घटना काल पाहायला मिळाली.
यांचे थोडक्यात माहिती अशी की .बंकलगी गावात काही महिन्यापुर्वी फिरत फिरत ज्योतिषी भविष्य सांगत फिरत होता .ज्योतीषाच्या पिंजऱ्यात पोपटाचे कातरलेले पंख पाहुन येथील श्रीकांत बनसोडे नावाचा इसमाला हळहळ वाटली ते पाहुन त्याचे मन गप्प बसलेले नाही त्यांनी ज्योतिषाला दम दिले तू त्या पोपटाचे पंख छाटली आहे तुझ्यावर गुन्हा करेन . असे विरोध केल्यावर ज्योतिषानी पिंजरा टाकून पळून गेला .बनसोडे यांनी पोपटासह पिंजरा घरी आणला ते पाऊन बनसोडे कुंटुबीयाना आनंद झाला . त्या मैनेवर संगोपान करण्याची जबादारी घेतली बनसोडे यांनी तीन महिने मैनेला सांभाळले जणू सुने सारखी . मैना झाली होती मोठी तिला निसर्गाच्या सानिध्यात सोडण्याचा निर्णय घेतला लॉकडाऊनच्या काळात पोपटाला मनमुक्त जीवन जगण्यासाठी निसर्गात सोडून दिली . तीन महिनेच्या प्रतिक्षेनंतर पोपटाला बनसोडे कुंटुबाची आठवण झाली .ज्या घराच्या अंगणा.तील दोरीवर बसत होती ;खेळत होती , ओरडत होती त्याच दोरीवर बसून कुंटुबीयाना हाक मारत होती मी पुन्हा आले .