लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळविले

0
352
सोलापूर :  लग्नाचे आमिष दाखवून एका पंधरा वर्षाच्या मुलीला पळवून नेल्याची घटना दि.६ जुलै रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सोलापूर येथे घडली.याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
    याबाबत अधिक माहिती अशी की,लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादीच्या कायदेशीर रखवालीतून फिर्यादीच्या मुलीला पळवून नेले आहे.असे फिर्यादीत म्हटले आहे.या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलिस ठाण्यात झाली असून,या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक पोळ हे करीत आहेत.