पाकिस्तानची मुजोरी कायम; नव्या नकाशात काश्मीर, लडाख, जुनागढावर ठोकला दावा

ताज्या घडामोडी राजकीय

नवी दिल्ली : आता नेपाळच्या मार्गावर पाकिस्तानही चालत असल्याचे दिसत आहे. पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारने विवादित नकाशाला मंजूरी दिली आहे. या नकाशात पाकिस्तानाने काश्मीर आपलं असल्याचं सांगितलं आहे. पहिल्यांदा पाकिस्तान केवळ पीओके आपला हिस्सा असल्याचे सांगत होता.

मात्र या नकाशात काश्मिरही सामील करण्यात आला आहे. पाकिस्तानने नवीन नकाशात लडाख सियाचिनसमेत गुजरातचा जूनागढपर्यंत दावा ठोकला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी याला पाकिस्तानातील इतिहासातील सर्वात ऐतिहासिक दिवस ठरवला आहे. या विवादीत नकाशाला मंजुरी इम्रान खान यांच्या कॅबिनेटमध्ये मिळाली. कॅबिनेट बैठकीनंतर इम्रान खान यांनी नवीन पॉलिटिकल मॅप जारी केला. नकाशात काश्मीर पाकिस्तानचा हिस्सा सांगितला आहे.

पाकिस्तान आधी नेपाळनेही अशा प्रकारच्या नकाशाला मंजुरी दिली होती. त्यांनाही विवादित नकाशाला मंजुरी दिली होती. ज्यामध्ये भारतातील कालापानी, लिपुलेख आणि लिंपियाधुरा याला सामील करण्यात आलं होतं. नेपाळने विवादित नकाशात 20 मे रोजी जारी केलं होतं, ज्याला तेथील संसदेने मंजुरी दिली होती. या विवादित नकाशाला ते आता संयुक्त राष्ट्र संघटन आणि गूगल सह आतंरराष्ट्रीय समुदायाला पाठविण्याची तयारी करीत आहे.

काश्मिरातून 370 कलम हटवण्याचा मोदी सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला होता. यानंतर पाकिस्तानच्या वर्तणुकीत मोठा बदल झाला आहे. यानंतर आता आपल्या देशाच्या जनतेला खूश करण्यासाठी तिने नवीन नकाशा जारी केला आहे. यादरम्यान पाकिस्तानचे परराष्ट्र् मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी सांगितले की नवीन नकाशा शाळांच्या अभ्यासक्रमात सामील करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *