पाच महिन्यातील धान्य वितरणाचा अहवाल दोन दिवसात द्या
वितरण अहवाल प्रत्येक ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागात लावा खासदार निंबाळकर यांची सूचना
बार्शी दि (तालुका प्रतिनिधी) : बार्शी तालुक्यातील रेशनच्या घोटाळ्या बाबतीत संतप्त झालेल्या खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मागील पाच महिन्यात वितरण करण्यात आलेल्या धान्याच्या बाबतीत सविस्तर अहवाल दोन दिवसात द्यावा अशी सूचना बार्शीच्या तहसीलदारांना दिल्या आहेत त्यामुळे आता बार्शी तालुक्यातील रेशनच्या काळ्या बाजाराच्या बाबतीत बऱ्याच काही गोष्टी उजेडात येण्याची शक्यता वाढली आहेअधिक माहिती अशी की खासदार निंबाळकर यांनी रविवारी बार्शी तालुक्यातील दौरा केला होता त्या दरम्यान कोविड बाबतीत सविस्तर चर्चा करून योग्य त्या सूचना दिल्या होत्या या दौऱ्यात रेशनच्या काळ्या बाजाराच्या बाबतीत चर्चा झाली नव्हती म्हणून त्याबाबत दैनिक जनसत्य ने वृत्त प्रकाशित केले होते त्या वृत्ताची दखल घेत आज सोमवारी बार्शी तहसीलदारांना लेखी सूचना दिल्या आहेत यामध्ये दि १ मार्च ते ३१ जुलै २०२० या पाच महिन्यात एकूण प्राप्त धान्य आणि बार्शी शहर आणि तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना योजना निहाय आणि युनिट निहाय वितरण करण्यात आलेले धान्य तसेच कोणत्या दराने कोणते धान्य वितरण करण्यात आले आहे अशी सर्व योजनेतील सर्व रेशन दुकानाची माहिती उलटपाली ताबडतोब द्यावी तसेच योजना निहाय व युनिट निहाय धान्य वाटपा बाबतची तपशीलवार माहिती प्रत्येक ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागात लावण्या बाबत स्वस्त धान्य दुकानदारांना आदेशीत करावे आणि केलेल्या कारवाई चा अहवाल तात्काळ सादर करावा अशी लेखी सूचना दिली आहे या सूचनेवरून बार्शीचे निवासी तहसीलदार संजीवन मुंढे यांनी आज सोमवारी तातडीने बैठक घेऊन सर्व रेशन दुकानदारांना सूचना देण्यात आल्या आहेत या बैठकीला पुरवठा निरीक्षक अभयकुमार साबळे,पुरवठा विभागाचे अव्वल कारकून ऋषिकेश धनवडे,तसेच रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष मारुती अंधारे, जिल्हा सरचिटणीस डॉ विजय साळुंखे, गुणवंत खांडेकर, बाळासाहेब डमरे,कळंबवाडीचे भोसले, आदी सह रेशन दुकानदार उपस्थित होते यावेळी पाच महिन्यात सर्व योजनेचा, मोफत आणि विक्री द्वारे वितरित करण्यात आलेल्या धान्याचा सविस्तर अहवाल दोन दिवसात देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत त्यामुळे काही रेशन दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे
खासदार निंबाळकर यांच्या सूचनेप्रमाणे कारवाई झाल्यास रेशनच्या घोटाळ्याच्या बाबतीत खऱ्या अर्थाने दूध का दूध आणि पाणी का पाणी निश्चित होईलAttachments area