टेंभुर्णी येथील बेकायदा डिझेल विक्री होणाऱ्या शेतातील पंपावर धाड

क्राईम ताज्या घडामोडी सोलापूर

स्थानिक गुन्हे शाखेचे कामगिरी : दोघांना अटक; सात लाखाचा मुद्देमाल हस्तगत


सोलापूर (प्रतिनिधी)

माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील एमआयडीसी पासून काही अंतरावर असलेल्या बेकायदा डिझेल विक्री होणाऱ्या पंपावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड टाकली.धाडीत दोघांना अटक करण्यात आले असून त्यांच्याकडून ७ लाख ९ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.        श्रीकृष्ण उफॅ दादा विजय कोल्हे (वय-३४),  रमेश विजय कोल्हे (दोघे रा.कोल्हे वस्ती,टेभुणी),  शंकर राजाराम किर्ते (वय-४५ रा.बेंबळे ता.माढा) असे गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत.यातील रमेश कोल्हे हा फरार झाला आहे.टेंभुर्णी येथे एमआयडीसी पासून काही अंतरावर असलेल्या शेतामध्ये बेकायदा डिझेल विक्री सुरू होती.शासकीय दराने मिळणाऱ्या ८६ रुपये प्रति लिटर पेक्षा ११ रुपये कमी भावात ७५ रुपयाला डिझेल मिळत होते.कमी भावात डिझेल मिळत असल्याने एमआयडीसी मध्ये आलेले मालट्रक थेट शेताच्या दिशेने धावू लागले.हा प्रकार गेल्या तीन महिन्यापासून सर्रासपणे सुरू होता.कोल्हे वस्ती वर बेकायदा डिझेलची विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना समजली.पोलिसांनी बुधवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास कोल्हे वस्ती धाड टाकली.तेव्हा तेथे ट्रॅक्टरच्या टँकरमधून मालट्रकमध्ये डिझेल भरले जात होते.पोलिसांनी श्रीकृष्ण उफॅ दादा कोल्हे व कामगार शंकर किर्ते या दोघांना ताब्यात घेतले.तर रमेश कोल्हे हा शेतातून पळून गेला.याप्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात अत्यावश्यक वस्तू अधिनियम कायदा १९५५ कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते,अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे,सहाय्यक फौजदार ख्वाजा मुजावर,नीलकंठ जाधवर,पोलीस अमलदार नारायण गोलेकर,धनाजी गाडी,अक्षय दळवी,चालक समीर शेख,माढा तहसील येथील पुरवठा अधिकारी यांनी पार पडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *