राधिका आपटेचा ‘तो’ न्यूड फोटो पुन्हा व्हायरल,

0
470

अभिनेत्री राधिका आपटे तिच्या दमदार आणि हटके अभिनय शैलीसाठी ओळखली जाते. आजवर राधिकाने वेगवेगळ्या भूमिका साकारत स्वत:ची ओळख निर्माण केली. सिनेमांसोबतच राधिका तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाजासाठी देखील ओळखली जाते. बोल्ड अंदाजामुळे अनेकदा राधिकाला ट्रोल व्हावं लागलं आहे. राधिका पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आली असून ‘#BoycottRadhikaApte’ हा ट्रेंड सध्या ट्विटरवर पाहायला मिळतो. नेटकऱ्यांनी राधिका आपटेच्या सिनेमांमवर बहिष्कार घालण्याची मागणी केली.

राधिकाच्या कोणत्याही नव्या सिनेमामुळे किंवा फोटोमुळे नव्हे तर एका जुन्या सिनेमातील सीनमुळे राधिकावर नेटकरी संतापले आहेत. राधिका आपटेच्या २०१६ सालामध्ये आलेल्या ‘पार्च्ड’ सिनेमातील न्यूड सीनचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सिनेमात राधिका आपटे आणि अभिनेता आदिल हुसैन यांच्यात एक न्यूड सीन होता. या सीनची त्यावेळी मोठी चर्चा झाली होती. या सीनमधील त्या न्यूड फोटोमुळे पुन्हा एकदा नेटकरी राधिकाला ट्रोल करत आहेत. भारतीय संस्कती जपा असं म्हणत नेटकऱ्यांनी राधिकासह बॉलिवूडवर निशाणा साधला आहे. ‘बॉलिवूड भारतीय संस्कृतीचा नाश करत आहे’ अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here