अर्थमंत्र्यांनी पगाराबाबतचा नियम बदलला; सॅलरीवर होणार थेट परिणाम

ताज्या घडामोडी देशविदेश

नवी दिल्ली : देशभरात पसरणाऱ्या कोरोना संकटामध्ये केंद्र सरकारने नोकरदार वर्गाला दिलासा दिला आहे. यानुसार प्रत्येक महिन्याला EPF चं कॉन्ट्रिब्युशन 24 टक्क्यांहून कमी केलं आहे. नव्या बदललेल्या नियमानुसार हा सहभाग 20 टक्के इतका असेल. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले की, मे, जून आणि जुलै महिन्यात कर्मचाऱ्यांचं केवळ 10 टक्के पीएफ कापला आणि कंपनीकडूनही 10 टक्क्यांचा सहभाग राहिलं. मात्र आज म्हणजेच 1 ऑगस्टपासून सर्व कर्मचाऱ्यांना हातात मिळणारा पगार कमी होईल.

काय आहे पगारातील पीएफ कापण्याचा नियम

EPF स्कीमच्या नियमांनुसार कर्मचाऱ्याला प्रत्येक महिन्याला आपल्या पगारातून बेसिक वेतन आणि डीएचे 12 टक्के आपल्या ईपीएफ अकाऊंटमध्ये जमा होतात. यासह कंपनीलाही समान रुपात 12 टक्क्यांच योगदान करावे लागते. त्यामुळे एकूण मिळून कर्मचाऱ्याच्या ईपीएफ अकाऊंटमध्ये 24 टक्के जमा होतात. या एकूण 24 टक्क्यातून कर्मचाऱ्याचा 12 टक्के हिस्सा आणि कंपनीचा 3.67 टक्के हिस्सा ईपीएफ अकाऊंटमध्ये जातो. तर बाकी शिल्लक कंपनीचा 8.33 टक्के हिस्सा एप्लॉयज पेंशन स्किम अकाऊंटमध्ये जातो.

कसे तपासाल तुमच्या अकाऊंटमधील पैसे

EPF बँलेंस 4 पद्धतीने चेक केले जाऊ शकते, एपीएफओ अपच्या माध्यमातून Umang App, SMS च्या माध्यमातून वा Missed Call देऊन तुम्ही जमा रक्कम तपासू शकता. EPF मधील जमा रक्कम कशी तपासाल- EPFO App m-EPF डाऊनलोड करा. यात Member वर क्लिक करा आणि Balance or Passbook वर क्लिक करुन UAN नंबर, रजिस्टर्ड मोबाइल क्रमांक टाकून जमा रक्कम चेक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *