NEET-JEE Exam |परीक्षा ठरल्या दिवशीच होणार! याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

ताज्या घडामोडी देशविदेश

नवी दिल्ली : नीट आणि जेईई (NEET-JEE) परीक्षा संदर्भातील फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. महाराष्ट्रासह सहा राज्यांनी ही याचिका दाखल केली होती. 17 ऑगस्टला कोर्टाने परीक्षा रोखण्यास नकार दिला होता. यावर फेरविचार याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, त्यावर सुनावणी घेण्यास कोर्टाने नकार दिला आहे.

बिगर भाजप शासीत 6 राज्य सरकारांनी सर्वोच्च न्यायालयात UGC-NEET परीक्षा पुढे ढकलण्यासाठी फेरविचार याचिका दाखल केली होती. कोरोना संकटात जेईईची परीक्षा 1 ते 6 सप्टेंबर व नीटची परीक्षा 13 सप्टेंबर रोजी होणार आहे. मात्र, देशातील कोरोना संसर्गाची परिस्थिती या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी काँग्रेससह अनेक विरोधी पक्ष करत आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात काँग्रेसने संपूर्ण देशात सोशल मीडियावर आंदोलनं देखील केलं.

ही फेरविचार याचिका पश्चिम बंगाल (मोलोय घटक), झारखंड (रामेश्वर ओरावण), राजस्थान (रघु शर्मा), छत्तीसगड (अमरजीत भगत), पंजाब (बी एस सिद्धू) आणि महाराष्ट्र (उदय रविंद्र सावंत) या मंत्र्यांनी दाखल केली होती. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात बिगर भाजप शासीत राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत बोलावलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता, की या निर्णयावर पुनर्विचार करण्यासाठी राज्ये एकमताने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतील.

परीक्षा ठरल्या दिवशीच होणार
जेईई मुख्य परीक्षा आता तोंडावर आल्यात तर एनईईटी परीक्षेसाठी काही दिवस बाकी आहेत. देशभरातील विद्यार्थी आणि पालकांकडून ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली जात आहे. काँग्रेसने या विरोधात देशभर आंदोलन सुरु केलं आहे. दिल्लीत काँग्रेसच्या अनेक नेत्यांना, कार्यकर्त्यांसह ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, याचा काहीही उपयोग झालेला नाही. ठरल्या वेळेवरच या सर्व परीक्षा होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *