पाटलांना तालुका अध्यक्ष बदलण्याचे अधिकार नाहीत

0
492
तालुक्यातील अध्यक्षपद बदल्याने राष्ट्रवादीमध्ये पेटले राजकारण
राष्ट्रवादी काँग्रेसचे  जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांची माहिती
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यात राष्ट्रवादी तालुकाध्यक्षपदी  जिल्हा कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील यांनी नवीन तालुकाध्यक्षाची निवड केली आहे. या निवडीला पाटलांना कोणताही अधिकार नसुन त्यांचे पद घटना बाह्य  असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष काका साठे यांनी दिली आहे.
     राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष साठे आणि  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थित दक्षिण सोलापूर तालुक्यात निवड करण्यात आलेल्या  अध्यक्षाची निवड रद्द करून जिल्हा कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील यांनी नवीन तालुकाध्यक्ष यांची निवड केल्यामुळे सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी मध्ये राजकारण पेटले आहे.
    जिल्हाध्यक्ष साठे यांनी दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्षपदी बिपिन करजोळे  यांची निवड केली होती, निवडीचे पत्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले होते.  मात्र या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील हे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सध्या राष्ट्रवादी आपल्या दारी नागरीकांचा जनता दरबार संपूर्ण जिल्हा परिषद गटांमध्ये राबवत आहेत असे असताना दक्षिण तालुक्याचे नवीन तालुका अध्यक्ष बिपीन करजोळे यांनी कोणताही कार्यक्रम घेतला नाही. उलट पूर्वीचे तालुका अध्यक्ष सुभाष पाटील यांनी सर्व नियोजन करून चांगल्या पद्धतीने नागरीकांचा जनता दरबार  हा कार्यक्रम घेतला. याच पार्श्वभूमीवर उमेश पाटील यांनी वरिष्ठांची बोलून बिपिन करजोळे यांच्या तालुका अध्यक्ष  निवडीला तडकाफडकी स्थगिती दिली. त्याबाबत त्यांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
एक तालुका राष्ट्रवादीचे दोन अध्यक्ष
जिल्हाध्यक्ष साठे यांनी दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्षपदी बिपिन करजोळे  यांची निवड केली होती, निवडीचे पत्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले. तर  राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील यांनी सुभाष पाटील यांची दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्षपदी निवड केली आहे. त्यामुळे हे दोघेही तालुका अध्यक्षपदी आपणच असल्याची माहिती कार्यकर्त्यांना देत असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here