अकलूजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ठिय्या आंदोलन

राजकीय

अकलूज : सदुभाऊ चौक ते गणेश नगर या रस्त्याच्या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी या मागणीसाठी अकलूजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अकलूज ग्रामपंचायत च्या विरोधात जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी सदाशिवराव माने पाटील यांच्या स्मरकासमोर ठिय्या आंदोलन केले,

सदर आंदोलनाचे निवेदन अकलूज ग्रामपंचायतचे बांधकाम विभाग प्रमुख ए एस जाधव यांनी स्वीकारले.यावेळी समता परिषदेचे तालुका उपाध्यक्ष पिंटू एकतपुरे,मनविसेचे तालुका अध्यक्ष संतोष शिंदे,

बहुजन ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष धनाजी जाधव-पाटील,मनसे अकलूज शहराध्यक्ष सुदाम आवारे,बहुजन ब्रिगेडचे अकलूज शहर अध्यक्ष आनंद मिसाळ,उपाध्यक्ष बंडू कांबळे,सागर अडगळे इत्यादी उपस्थित होते.

अकलूजमध्ये गणेश नगर ते सदुभाऊ चौक या रस्त्याचे केलेले खडीकरणाचे काम हे निकृष्ठ दर्जाचे करण्यात आले आहे, संबंधित कामामध्ये अनियमितता असल्याची शक्यता असून त्यामध्ये दर्जाहीन मटेरियल वापरले असल्याची दाट शक्यता आहे,

या रस्त्याचे केलेले काम प्रत्येक्ष पाहणी केली असता अनेक ठिकाणी रस्ता खचल्याचे दिसून आले आहे,या रस्त्यावर अजून फायनल डांबरी करणासाठी सिलकोट होणे बाकी असतानाच हा रस्ता खचल्याने यावर डांबरीकरणं केल्यानंतर ते कसे टिकणार हा प्रश्न निर्माण झाला आहे,याचाच अर्थ असा की संबंधित काम हे निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे,असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनाची दखल घेऊन अकलूज ग्रामपंचायत ने शाखा अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद माळशिरस यांना लेखी पत्र काढून संबंधित कामाची चौकशी करावे असे लेखी पत्र दिले आहे.संबंधित अधिकारी यांनी या कामामध्ये ठेकेदाराला पाठिशी घालण्याचा प्रयत्न केल्यास पुन्हा २० जुलै रोजी अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *