भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता, उत्तर महाराष्ट्रात अनेक बडे नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात

ताज्या घडामोडी महाराष्ट्र

मुंबई : कोरोनासारखा जीवघेणा संसर्ग, मराठा आरक्षण आणि मुसळधार पाऊस अशा मुद्द्यांवर राज्यात वातावरण तापलं असताना आता राष्ट्रवादीच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंगला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भरती सुरूच आहे. यानंतर आता भाजपचे अनेक नेते हे राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांच्या संपर्कात असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे सत्ता गमावल्यानंतर आता भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्रामधील भाजप नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. त्यामुळे याच भागातून पक्ष प्रवेशाला सुरुवात होणार आहे. यासंबंधी एनसीपी कार्यालयात शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यासह उत्तर महाराष्ट्र राष्ट्रवादी आमदारांची बैठक सुरू आहे. इतर पक्षातील विशेषत भाजपातील काही नेते यांना राष्ट्रवादी पक्षप्रवेश द्यायचा का याबाबत खलबत सुरू असल्याची चर्चा आहे. सध्या अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *