NCB ची मोठी कारवाई, अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा हस्तकाला ठोकल्या बेड्या!

क्राईम ताज्या घडामोडी देशविदेश

मुंबई : मुंबई पोलिसांच्या अंमली विरोधी पथक ने धडक कारवाई करत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक चिंकू पठाणला बेड्या ठोकल्या आहे. चिंकू पठाण हा गँगस्टर करीम लालाचा नातेवाईक आणि हस्तक असल्याची माहिती समोर आली आहे.

अंमली विरोधी पथकाने गेल्या काही दिवसांपासून मुंबई अंमली पदार्थ तस्करी करण्याचे कंबरडे मोडले आहे. याच कारवाई दरम्यान, अंमली विरोधी पथकाने गँगस्टर चिंकू पठाण पकडले आहे. त्याला नवी मुंबईतील घनसोली येथून अटक करण्यात आली आहे.

अंमली विरोधी पथकाची ही मोठी कामगिरी मानली जात आहे. चिंकू पठाण हा गँगस्टर करीम लालाचा खास हस्तक आहे. तसंच तो अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा देखील हस्तक असल्याची NCB ची माहिती आहे. चिंकू पठाणकडून एनसीबीने एमडी ड्रग्स जप्त केले आहे. त्याला अटक केल्यानंतर मुंबई अंमली पदार्थ तस्कारांना मोठा हादरा बसला आहे.

मुंबई पोलिसांनी पकडले लाखो रुपयांचे अंमली पदार्थ

दरम्यान. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँच युनिट बाराने दहिसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 19 जानेवारी रोजी केलेल्या कारवाईदरम्यान 1 कोटी 60 लाख रुपयांच्या तीन किलो चरससह तीन जणांना अटक केलेले आहे.

19 जानेवारी रोजी अंमली पदार्थ तर त्यांच्याविरोधात कारवाई करताना दहिसर पूर्व येथे पोलिसांनी गस्त सुरू केली होती. या दरम्यान पोलिसांना तीन जण संशयास्पद हालचाली करताना आढळून आले. या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची तपासणी केली असता या आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता.

मात्र, पोलिसांनी बळाचा वापर करणाऱ्या तिघांना पळून जाण्यास अटकाव केला होता. या तिघांकडे असलेल्या रेक्झिन बॅगमध्ये प्रत्येकी एक किलो चरस आढळून आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जप्त केलेल्या पदार्थांची किंमत एक कोटी 60 लाख रुपये एवढी असल्याचे समोर आले.  पोलिसांनी आणखी दोन किलो चरस जप्त केलेला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अब्बास शेख, अलमपूर शेख आणि शमशाद अब्दुल खलील शेख या आरोपींना अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *