ड्रग्स प्रकरणी NCB मुंबईत मोठी कारवाई, एकाच वेळी अनेक ठिकाणी छापेमारी

ताज्या घडामोडी मनोरंजन मुंबई

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू असताना बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शन समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं (NCB) मुंबईत (Mumbai) मोठी कारवाई केली आहे. NCB च्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी एकाच वेळी मुंबईत अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे.

NCB च्या सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शन समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. ड्रग्स प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि शोविक चक्रवर्ती याच्याकडून एनसीबीच्या चौकशीत धक्कादायक माहिती दिली आहे. रिया आणि शोविक यांच्या मोबाइल चॅटमधून ड्रग्स नेटवर्कमध्ये अनेक बडे मासे असल्याची माहिती एनसीबीच्या पथकाला मिळाली आहे.दरम्यान, NCB नं या आधी रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवार्ती, सैम्युअल मिरांडा, दीपेश सावंत यांना अटक केली आहे. सध्या सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. याआधी EDनं रियाची कसून चौकशी केली होती. यात रियाच्या मोबाईल चॅटमध्ये ड्रग्स माफियांशी झालेले चॅटिंग उघड झालं होतं. त्यानंतर NCB तपास करत आहे.

दरम्यान, NCB नं या आधी रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवार्ती, सैम्युअल मिरांडा, दीपेश सावंत यांना अटक केली आहे. सध्या सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. याआधी EDनं  रियाची कसून चौकशी केली होती. यात रियाच्या मोबाईल चॅटमध्ये ड्रग्स माफियांशी झालेले चॅटिंग उघड झालं होतं.  त्यानंतर NCB तपास करत आहे.

रकुल प्रीत सिंहची दिल्ली हायकोर्टात धाव

दुसरीकडे, अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला ताब्यात घेतलं आणि चौकशीत धक्कादायक खुलासे समोर आले. ड्रग्ज प्रकरणात रियाने अनेक दिग्गज कलाकारांनी नावं उघड केली आहेत. यात अभिनेत्री रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) हीचं नाव आल्यानंतर तिने आता थेट दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi high court) धाव घेतली आहे.

रकुल प्रीत सिंह हिनं दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करत तिच्या विरोधात मीडिया कव्हरेजवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. माध्यमांच्या बातम्यांद्वारी तिची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं तिने याचिकेमध्ये म्हटलं आहे.

रकुल प्रीतनं याचिकेत म्हटले आहे की, ‘रिया चक्रवर्तीने चौकशीत माझं नाव घेतल्यानंतर मीडिया ट्रायल सुरू झालं आहे.त्यामुळे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला तिच्याविरूद्ध माध्यमांचं कव्हरेज रोखण्यासाठी निर्देशित देण्याचं आवाहन तिने कोर्टाकडे केलं आहे. ड्रग्स प्रकरणात रिया चक्रवर्तीने तिचं आणि सारा अली खानचं नाव घेतलं अशी माहिती शूटिंगदरम्यान मला समजली. यानंतर माध्यमांमध्ये अनेक प्रकारची चुकीची माहिती पसरवण्यात येत आहे असं तिने याचिकेमध्ये लिहलं आहे.

रकुल प्रीतच्या वकिलांनी उच्च न्यायालयात सांगितलं की, मीडिया रकुलला हॅक करत आहे. त्यावर रकुल हिनं थेट माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे अधिकृत तक्रार का केली नाही? असा सवाल कोर्टाकडून विचारण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *