सोलापूर (प्रतिनिधी) : लग्नाचे आमिष दाखवून खासगी हॉस्पिटलधील नर्सवर बलात्कार करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांवर विजापूर नाकापोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पिडीत महिला एका खासगी हॉस्पिटलमध्ये नर्स आहे.तिच्या पतीचे २०१५ मध्ये निधन झाले होते.त्यावेळी तिची मैत्रिण रेणुका बाळु राठोड (रा.हनुमान नगर,सोलापूर) हिने तिचा मावस भाऊ मिथून चव्हाण (रा.बाळे) हा तिच्यावर प्रेम करत असल्याचे सांगत दोघांची ओळख करून दिली.दरम्यान मिथूनने त्या नर्सला लग्नाचे आमिष दाखवत वेळोवेळी तिच्यावर बलात्कार केला. यानंतर मिथून त्या नर्सला मानसिक त्रास देत तिच्याकडे पैशाची मागणी करत होता.६० हजार रूपये घेतल्यानंतर मिथूनने लग्न करण्यास नकार दिला.या त्रासाला कंटाळून त्या नर्सने २४ जुलै रोजी गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.मात्र तिच्या आईने तिला वेळवेर दवाखान्यात दाखल केले.त्यानंतर त्या नर्सने रेणुका राठोड आणि मिथून चव्हाण यांच्या विरोधात विजापूर नाका पोलिसात फिर्याद दिली. पो.स.ई.बेंबडे तपास करत आहेत.
