धारदार शस्त्रानं पतीनंच केला पत्नी आणि मुलीचा खून

Uncategorized क्राईम ताज्या घडामोडी

जालना : भरदिवसा एकाच कुटुंबातील दुहेरी हत्याकांड झाल्यानं जालना जिल्हा हादरला आहे. एका माथेफिरू पतीनं चारित्र्याच्या संशयावरून पत्नी आणि मुलीची निर्घृण हत्या केला आहे. परतूर तालुक्यातील आष्टी येथील अकोली गावात बुधवारी भरदिवसा हा थरार पाहायला मिळाला आहे.ज्योती शहाजी देशमुख (27) आणि ऋतुजा शहाजी देशमुख (7) अशी मृतांची नावं आहेत. शहाजी देशमुख असं आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपीनं पत्नी आणि मुलीवर निर्दयीपणे धारदार शस्त्रानं सपासप वार केले. त्यामुळे दोन्ही मायलेकींनी जागेवरच प्राण सोडले.

मिळालेली माहिती अशी की, शहाजी देशमुख या माथेफिरूनं रागाच्या भरात आपल्या पत्नी ज्योती आणि मुलगी ऋतुजा हिचा धारदार हत्यारानं वार करून खून केला. या घटनेमुळं परतूर तालुक्यातील आष्टी येथील अकोली गावात शोककळा परसरी आहे. भरदिवसा घडलेल्या या थरारनाट्यामुळे संपूर्ण गावात भीतीचं वातावरण पसरलं आगे. दरम्यान, पत्नीच्या चारित्र्यावर संशयाच्या वादातून हे हत्याकांड घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.अकोली ता. परतूर येथील शहाजी देशमुख हा आपल्या पत्नी आणि एका मुलीसह राहत होता. दरम्यान, शहाजी याचा पत्नी शहाजी याचा पत्नी ज्योती हिच्यासोबत बुधवारी सकाळी वाद झाला होता. या वादातून संतापलेल्या शहाजी याने घरातील एका धारदार सस्त्रानं पत्नी आणि मुलीवर सपासप वार केले. या हल्ल्यात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला.शहाजी यानं पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून हे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहेय. घटनेनंतर आरोपी शहाजी यानं पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा पाठलाग करून आष्टी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.. याप्रकरणी आष्टी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *