26 वर्षीय गर्लफ्रेंडच्या मदतीने काढला आईचा काटा, पुण्यात 19 वर्षीय मुलाने गाठला क्रूरतेचा कळस

ताज्या घडामोडी पुणे

पुणे : जगात कोणतं नातं जे सर्वश्रेष्ठ मानलं जातं ते म्हणजे आई-मुलाचं नातं. पण याच नात्याला काळीमा फासणारी घटना पुण्यामध्ये घडली आहे. एका 19 वर्षीय मुलाने त्याच्याच आईची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये त्याच्या 26 वर्षीय गर्लफ्रेंडने देखील त्याची साथ दिल्याची माहिती समोर येते आहे. पोलिसांनी त्या तरुणास अटक केली असून, त्याच्या गर्लफ्रेंडवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या मुलाच्या आईला त्याचं आणि त्याच्या गर्लफ्रेंडचं नातं मंजुर नव्हतं. पोलिसांनी अशी देखील माहिती दिली आहे की, त्याच्या आईने या मुलावर घरातील पैसे चोरी केल्याचा देखील आरोप केला होता

पुण्यातील हवेली तालुक्यात असणाऱ्या वढू खुर्द, माने वस्तीमध्ये ही घटना घडली. या घटनेत मृत आईचं नाव सुशीला राम वंजारी असून त्यांचं वय 38 वर्षे आहे. त्यांचा मृतदेह पहाटे 3 वाजता सापडला आणि परिसरात एकच गोंधळ उडाला होता. मिळालेल्या माहितीनुसार या मुलानेच त्याच्या आईचा खून झाल्याची तक्रार केली होती. त्याने जालन्यातील एका व्यक्तीवर कर्ज परतफेड करण्याच्या भांडणातून खून केल्याचा आरोप केला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. विशाल वंजारी (वय 19) असं या तरुणाचं नाव आहे.

पोलिसांनी तपास केला असता, या प्रकरणाच्या मुळाशी विशालच असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दरम्यान त्याने धारधार शस्त्राने वार करत आईची हत्या केली. स्थानिक गुन्हे शाखेने इन्स्पेक्टर पद्माकर घांवत यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा छडा लावला. त्यात समोर आले की, यामध्ये त्याच्या 26 वर्षीय गर्लफ्रेंडने देखील यामध्ये विशालची मदत केली आहे. नॅन्सी डोंगरे अशी तिची ओळख समोर आली आहे.

विशाल आणि नॅन्सीने कट रचून पोलिसांना सांगण्यासाठी खोटी कहाणी तयार केली. त्यांनी जालन्यातील एका व्यक्तीवर खुनाचा आरोपही केला. पण खरा प्रकार सोमवारी त्याच्या आईशी त्याचं भांडण झाल्यानंतर घडला होता. त्याच्या आईने त्याच्यावर 15,500 रुपये चोरल्याचा आरोप केला होता. त्याच रागाच्या भरात विशालने त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारी आई गमावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *