करमाळा : मासेमारीच्या वादातून करमाळा तालुक्यातील चिखलठाण नं.१ येथे एका तरूणाचा खूण झाल्याची घटना घडली. ही घटना शनिवारी सायंकाळी चिखलठाण नं.१ येथील भीमा नदीच्या काठी घडली.
अजित नवनाथ गलांडे असे खूण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी मयताच्या वडिलांनी फिर्याद दिली असून या फिर्यादीत असे म्हटले आहे की,
मिथुन नवनाथ गलांडे व अजित नवनाथ गलांडे चिखलठाण नं.१ येथील गलांडे मळ्याच्या शेजारील भीमा नदीच्या काठी तुटलेली माशाची जाळी विणण्याचे काम करीत असताना उमेश राजाराम गलांडे,
संतोष राजाराम गलांडे,राजाराम बलभिम गलांडे रा.चिखलठाण ऩ.१ यांनी मिथुन व अजित यांना मासेमारी करण्यासाठी वडाप या ठिकाणी का लावले,मासेमारी करण्याची ही आमची जागा आहे असे म्हणत अजित व मिथुनला काठीने मारले.त्यामध्ये अजित याचा जागीच मृत्यू झाला व मिथुन यास गंभीर जखमी केले.
या घटनेतील संशयीत उमेश राजाराम गलांडे,संतोष राजाराम गलांडे,राजाराम बलभिम गलांडे रा.चिखलठाण ऩ.१ यांच्या विरोधात करमाळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.