दगडाने ठेचून महिलेचा खून करणाऱ्या बागायतदाराला अटक

क्राईम ताज्या घडामोडी सोलापूर


सोलापूर (प्रतिनिधी)

 करमाळा तालु्नयातील वीट गावात महिलेचा दगडाने ठेचून खून करणाऱ्या बागायतदाराला सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी अवघ्या 48 तासात अटक केली. अशी माहिती पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली.धनाजी प्रभाकर गाडे (वय 27, रा. वीट, ता, करमाळा, जि. सोलापूर) असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. करमाळा तालु्नयातील वीट गावात शेतात 10 ते 12 वर्षाचा मुलगा शाळा सुटल्यानंतर शेताकडे पायी चालत जात असताना ओढयाजवळ त्याच्या आईची चप्पल व स्कार्फ पडल्याचे दिसले, आजुबाजूला शोधा शोध करूनही त्याची आई त्याला दिसली नाही. त्यामुळे त्याने ही घटना त्याच्या वडीलांना सांगितली. पत्नी शेतात कामाला गेली होती परंतु बराच वेळ झाला तरी घरी आली नाही म्हणून त्यानेही शोधा शोध केली असता करमाळा येथील वीट ते मोरवड  गावाला जाणाऱ्या रस्त्यावरील जुन्या ओढयाजवळ बाभळीच्या झाडाखाली झुडपाचे आडोशाला एका 27 वर्षीय महिलेचा मृतदेह छिन्नविछीन्न अवस्थेत पडलेला दिसला जवळ जावून पाहिल्यावर ती आपलीच पत्नी भाग्यश्री विकास गाडे (वय 27) असल्याचे समजले त्यानंतर तातडीने पोलीसांना कळवण्यात आले पोलीसांनी जागेचा तसेच मृतदेहाचा पंचनामा केला आणि जवळच पडलेला एक दगड आणि त्याच दगडाने तिच्या तोंडावर मारून तिचा खून केल्याचे आढळून आले. याबाबत करमाळा पोलीस ठाण्यात विकास रावसाहेब गाडे (वय 38) याने खुनाची फिर्याद दिली. ही बाब गंभीर असल्याने पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी घटनास्थळाला भेट देवून या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांना करण्यास सांगितले त्यावरून पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी तीन पथके तयार केली आणि तपास सुरू केला. गावातील अनेकांच्याकडून माहिती काढण्याचा प्रयत्न केला परंतु काहीच सुगावा लागत नव्हता एकजण खुनाच्या घटनेपुर्वी अनेकदा चक्कर मारत होता आणि त्याचे मृत महिलेबरोबर वाद झाला होता अशी माहिती मिळाली त्यावरून पोलीसांनी धनाजी प्रभाकर गाडे (वय 27) याला ताब्यात घेतले. धनाजी हा बागायतदार होता आणि त्याचे भाग्यश्री हिच्याशी अनैतिक संबध होते त्यातून भाग्यश्री हिने अनेकदा पैशाची मागणी केली पैसे नाही दिले तर बलात्काराची केस करते असे म्हणून ब्लॅकमेल करीत होती त्यातून तिला शेतात बोलावून तिच्यावर दगडाने ठेचून तिचा खून केल्याची कबुली आरोपी धनाजी गाडे याने पोलीसांसमोर दिली असल्याचे पोलीस अधिक्षक सातपुते यांनी दिली. ही कामगिरी पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र मांजरे, शाम बुवा, पोलीस उपनिरीक्षक अमित सिद पाटील, सहाय्यक फौजदार ख्वाजा मुजावर,पोलीस हवालदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, राजेश गायकवाड, बिराजी पारेकर, श्रीकांत गायकवाड, मोहन मन्सावाले, विजयकुमार भरले, सलीम बागवान, बापू शिंदे, रवी माने, लालसिंग राठोड, सचिन गायकवाड, धनराज गायकवाड, अक्षय दळवी, अजय वाघमारे, पांडुरंग काटे, चालक समीर शेख, केशव पवार आदींनी बजावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *