धारदार शस्त्राने पत्नीचा खून

ताज्या घडामोडी महाराष्ट्र

पॅरोलवर बाहेर तुरुंगाबाहेर आलेल्या कैद्याचे कृत्य

उस्मानाबाद – जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आरोपीने पॅरोलवर बाहेर येताच आपल्या पत्नीची कुऱ्हाडीने हत्या केल्याचे घटनेने जिल्हात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार उस्मानाबाद तालुक्यातील शेकपूर येथील खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या भागवत केरबा कांबळे याने पत्नी कौसाबाईचा खून केला. आरोपी अभिवचन रजेवर (पॅरोल) कारागृहाबाहेर होता. पती- पत्नी संघर्षातून 21 जानेवारी रोजी 11.30 वा. सु. शेकापूर येथील घरात पत्नी- कौसाबाई भागवत कांबळे, वय 55 वर्षे हिच्या गळ्यावर कुऱ्हाडीने घाव घालून तीचा खून केला. अशा मजकुराच्या मुलगा- शक्ती भागवत कांबळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भागवत कांबळे विरुध्द भा.दं.सं. कलम- 302 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *