शेती विधेयकानंतर मोदी सरकार हमीभावाबद्दल मोठा निर्णय घेण्याची शक्यता

ताज्या घडामोडी देशविदेश

नवी दिल्ली : शेती विधेयकाला राज्यसभेत मंजुरी मिळाल्यानंतर देशभरात तीव्र पडसाद उमटत आहे. या वादातच आता मोदी सरकार MSP (Minimum Support Price) वस्तूंची हमी भावाबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. केंद्रीय कॅबिनेट बैठकीमध्ये याबद्दल निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.  2020-21 च्या रब्बी हंगामात हमी भावाला मंजुरी देण्याची शक्यता आहे. आज दुपारी 1.30 वाजता कॅबिनेटची बैठक होणार आहे.

जर हा निर्णय झाल्यास गहू, जवसाच्या हमीभावात मोठी वाढ होऊ शकते तर कडधान्याच्या हमीभावात तब्बल 7.4 टक्क्यांची वाढ करण्याची शिफारस करण्यात आली आहे. कृषीमूल्य आयोगाची गव्हाच्या किमतीत वढ करण्याची शिफारस     केली आहे. गव्हाची हमीभावात वाढ करण्याचा मोठा निर्णय़ होऊ शकतो. उत्तर भारतात शेतकरी विधेयकाला असलेल्या निर्णयाच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय होण्याची चिन्ह आहे.

गव्हाला 85 रुपये प्रति क्विंटल भाव वाढीची शिफारस करण्यात आली आहे. गव्हाला एमएसपी 2019 – 20 मध्ये 1840 रुपये प्रति क्विंटल भाव होता. तो वाढवून 1925 रुपये प्रति क्विंटल करावा अशी शिफारस करण्यात आली आहे. हरभऱ्याच्या भावात 255 रुपये वाढ करून  4875 रुपये प्रति क्विंटल करण्याची शिफारस करण्यात आली आहे. सर्वात जास्त हमी भाववाढ ही दाळींमध्ये करण्यात आली आहे. 7.3 टक्के इतकी वाढ करण्याची शिफारस यात करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *