नातंवडांसह मुलीने आईला मारहाण करत काढले घराबाहेर

क्राईम सोलापूर

सोलापूर नरेंद्र नरातील लाजीरवाणी घटनार

सोलापूर (प्रतिनिधी) आधार नसलेल्या थकलेल्या जीवाला मुलीचा आधार होईल म्हणून मुलीच्या दारात पाऊल ठेवलेल्या आईला मुलीने तसेच नातवाने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून घराबाहेर हाकलून गेल्याची घटना विजयपूर रोड परिसरातील नरेंद्रनगर घडली.             काही वर्षांपूर्वी  पतीचा मृत्यू झाला  यानंतर  हक्काचा असा आधार  म्हणून  त्या मातेने मुलीकडे पाहिले. थरथरत्या हाताला हात देऊन मुलगी आधारवड होईल अशी त्या मातेची मनोमन इच्छा होती या इच्छेतून अच ती माता मुलीच्या घरी गेली.  मात्र, पोटच्या मुलीने व तिच्या मुलांनी (नातवंडे) चिडून तू पुन्हा घरात का आली म्हणून शिवीगाळ करीत मारहाण करुन घराबाहेर हाकलून दिल्याची घटना विजयपूर रोडवरील नरेंद्र नगरात घडली आहे. याप्रकरणी त्यानंतर मंगळवारी (ता. 25) चनव्वा बिराजदार यांनी विजापूर नाका पोलिस ठाणे गाठले आणि मुलगी व नातवंडांविरुध्द फिर्याद दिली.         साधारण आठ महिन्यांपूर्वी विजयपूर रोडवरील नरेंद्र नगरात आई मुलीसोबत राहण्यास होती. मुलीशिवाय कोणाचाही आधार नसलेल्या चनव्वाबाई काही दिवस मुलीकडेच राहत होत्या.मात्र, वय झाल्याने त्यांना काहीही व कोणतेही काम करता येत नव्हते. त्यामुळे  पोटच्या मुलीने आठ महिन्यांपूर्वी आईला घरातून हाकलून दिले होते.दरम्यानच्या काळात मुलीचा आपल्यावरील राग कमी झाला असेल, नातवंडे आजीला घरात घेतील, या भावनेने व विचाराने आई चनव्वा तिपण्णा बिराजदार (वय- 81) मुलगी निलव्वा भिमराव बिराजदार (रा. नरेंद्र नगर) हिच्याकडे 25 ऑगस्ट रोजी पुन्हा गेल्या होत्या. त्यांनी थकवा आल्याने मुलीकडे एक कप चहा ची मागणी केली. मात्र  आईला पाहताच  तळपायाची आग मस्तकात गेलेल्या मुलीने तू पुन्हा घरी का आली म्हणून मुलगी आणि त्यांच्या मुलांनी तसेच ज्योती भिमराव बिराजदार, विजयालक्ष्मी बिराजदार, संतोष बिराजदार यांनी शिवीगाळ करीत मारहाण केली, असेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध ज्येष्ठ नागरिक अधिनियम 2007 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

यापूर्वी चनव्वा यांना दोन वेळा हाकलून दिले होते
पोटच्या मुलीने घराबाहेर हाकलून दिल्याने सात महिने आई चनव्वा या डॉ. नानासाहेब अर्जून यांच्याकडेच राहत होत्या. त्यांनीच चनव्वा यांना आधार दिला. मात्र, मुलीच्या ओढीने 17 जुलै 2020 रोजी चनव्वा पुन्हा मुलीकडे गेल्या. त्या वेळी मुलीने त्यांना हाकलून दिले होते असाच अनुभव यांना यांना दरम्यानच्या काळात दोन वेळा आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *