अखेर शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूरीचे आदेश पारित

ताज्या घडामोडी सोलापूर


वडवळ

-सोलापूर जिल्ह्यातील तब्बल ३८८ शिक्षक बांधवांच्या वरिष्ठ वेतनश्रेणीचे मंजूर आदेश आज अखेरीस पारित  झाल्याची माहिती जिल्हा प्रसिध्दीप्रमुख आशिष चव्हाण यांनी दिली.      २३ अॉक्टोबर रोजीच्या शासन निर्णयानंतर वरिष्ठ वेतनश्रेणी जवळजवळ अशक्य वाटत होती पण पेन्शन संघटनेचा जन्मच मुळी संघर्षातून व संघर्षासाठी झाला आहे . हेही आव्हान संघटनेच्या शिलेदारांनी स्वीकारून लीलया पेलले. सन २०१८ -१९ मध्ये ६७४ शिक्षकांना लाभ मिळाला तर २०१९-२० मध्ये ३८८ शिक्षकांना या वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ देण्यात आला आहे. पेन्शन संघटनेने केलेलं हे कार्य सर्वसामान्य पेन्शन फायटर्समध्ये आत्मविश्वास जागा करण्यासाठी ,त्यांना स्वतःच्या क्षमता व मर्यादा यांची जाणिव करुन देण्यासाठी केले आहे, असे मत सहकार्याध्यक्ष साईनाथ देवकर यांनी व्यक्त केले.केंद्र संघटक ते राज्य पदाधिकारी असा संघटनेचा प्रत्येक घटक या कामासाठी झटला त्याचे हे फलित आहे.याकामी सर्व संघटना व त्यांच्या पदाधिकारी यांचा तालुका ते जिल्हा अशा सर्व पातळीवर याकामी पाठिंबा व सहकार्य लाभले असल्याची भावना  जिल्हा संघटक सुखदेव वाघमारे यांनी व्यक्त केली.

\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना येत्या काळात शिक्षक बांधवांच्या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी  एक संघटना म्हणून नव्हे तर एक परिवार म्हणून ताकदीनिशी सदैव तत्पर राहील असे उदगार प्रवक्ते प्रशांत लंबे यांनी व्यक्त केले.या संपूर्ण प्रक्रियेत सहकार्य करणारे जि प अध्यक्ष मा.अनिरुद्ध अण्णा कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी मा. दिलीप स्वामी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत , प्राथमिक विभाग शिक्षणाधिकारी मा.संजय राठोड, सामान्य प्रशासन विभागाचे अनिल जगताप,चिडगुपी सर,शिक्षण विभागातील कक्ष अधीक्षक मुत्तवली , जाधव  मॅडम, जेऊरगी सर ,बिराजदार सर यांचे संघटनेच्या वतीने  आभार मानण्यात आले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *