मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग निहाय आरक्षण सोडत

ताज्या घडामोडी सोलापूर

जनसत्य, बालाजी शेळकेमोहोळ

येत्या मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग निहाय आरक्षण सोडतीचा कार्यक्रम मुख्याधिकारी कार्यालयांमध्ये पार पडला. यामध्ये एकूण १७ नगरसेवकांसाठी असलेल्या या नगरपरिषदेसाठी सर्वसाधारण ५, सर्वसाधारण महिला ४, नागरिकांचा मागास प्रवर्ग २, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ३, अनुसूचित जाती १, अनुसूचित जाती महिला २ असे प्रभाग आरक्षित झाले आहेत. दरम्यान अनेकांच्या सोयीचे आरक्षण पडल्याने अनेक प्रभागांमध्ये फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली तर सोयीचे आरक्षण पडले नसल्याने अनेक जण निराश होऊन परतल्याचे दिसून आले.
मोहोळ नगर परिषदेच्या मुख्याधिकारी कार्यालयांमध्ये दि.१० फेब्रुवारी उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्या उपस्थितीमध्ये नगरसेवकांच्या प्रभाग निहाय आरक्षण आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पडला.मोहोळ नगरपरिषद स्थापन झाल्यापासून ची ही दुसरी सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक असणार आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांनी आपली उमेदवारी सादर करण्यासाठी त्या त्या वॉर्डांमध्ये जनसंपर्क वाढवला होता. मात्र अपेक्षित असलेले आरक्षण स्वतःच्या प्रभागांमध्ये पडले नसल्याने अनेकांना पर्यायी प्रभाग शोधण्याची वेळ आली आहे मात्र गेटकेन उमेदवाराला तेथील मतदार कितपत स्वीकारतील, हा प्रश्न अनेक इच्छुक उमेदवार समोर उभा ठाकला आहे.दरम्यान मोहोळ नगर परिषदेसाठी गेल्या पाच वर्षात झालेल्या चार नगराध्यक्षांचे स्वतःचे वार्ड आरक्षित झाल्याने त्यांना पर्यायी प्रभाग शोधावे लागणार आहेत.
प्रभाग निहाय आरक्षण सोडत ही चक्राकार पद्धतीने राबवण्यात आली. तर पूर्वीचे महिला साठी असलेले प्रभाग यावेळी पुरुष सर्वसाधारण साठी आरक्षित करण्यात आले आहेत .यामध्ये चक्राकार पद्धतीने अनुसूचित जातीसाठी असलेले पूर्वीचे प्रभाग बदलून प्रभाग क्रमांक सहा, सात तसेच तेरा असे आरक्षित करण्यात आले आहेत.
अनेक प्रभाग चिठ्ठी टाकून आरक्षण जाहीर केल्यामुळे ही चिठ्ठी समृद्धी नागेश भोसले (वय-९), आर्यन सचिन गायकवाड (वय- ११) या शालेय विद्यार्थ्यांनी काढली.
या प्रभाग निहाय आरक्षण सोडत कार्यक्रमासाठी उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुख्याधिकारी एन. के. पाटील, नायब तहसीलदार राजशेखर लिंबारे, प्रियंका चव्हाण, सुवर्णा हाके, मोईन डोणगावकर, मनोज पुरानिक, अमित लोमटे, महेश माने, राजकुमार सपाटे, दिनेश गायकवाड, राजू शेख, गोवर्धन अष्टुळ आदी प्रयत्नशील होते.
यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख अशोक भोसले, भाजपाचे सतीश काळे, प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर, उपनगराध्यक्ष प्रमोद डोके, युवा नेते आण्णा फडतरे, युवा नेते संतोष सुरवसे, नगरसेवक सत्यवान देशमुख, शिवसेना शहरप्रमुख विक्रम देशमुख, काकासाहेब देशमुख, बाळासाहेब गायकवाड, शिवरत्न गायकवाड, नागेश वनकळसे, दाजी गाढवे, हेमंत गरड, सिकंदर बोगे, नगरसेवक सुशील क्षिरसागर, बापू आठवले, लखन कोळी, गणेश गावडे, बिरु देवकते, मुस्ताक शेख , किशोर पवार, दिलीप गायकवाड, सागर लेंगरे, यशोदा कांबळे, आतुल गावडे, रणजित गायकवाड, रुपेश धोत्रे, शांतिकुमार अष्टुळ, अभय गायकवाड, रमजान तांबोळी, राजन घाडगे, हिंदुराव देशमुख, आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते
\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\

मोहोळ नगर परिषदेच्या आरक्षित झालेले प्रभाग असे आहेत.
प्रभाग क्र १- सर्वसाधारण महीला, प्रभाग क्र २- ओबीसी महीला, प्रभाग क्र ३- सर्वसाधारण महीला, प्रभाग क्र ४- ओबीसी महीला,प्रभाग क्र ५- सर्वसाधारण महीला,प्रभाग क्र ६- अनुसूचित जाती महीला ,प्रभाग क्र ७- अनुसूचित जाती महीला प्रभाग क्र ८- सर्वसाधारण,प्रभाग क्र ९- सर्वसाधारण,प्रभाग क्र १०- सर्वसाधारण महीला,प्रभाग ११- सर्वसाधारण,प्रभाग १२- ओबीसी,प्रभाग क्र १३- अनुसूचित जाती,प्रभाग १४- सर्वसाधारण,प्रभाग क्र १५-ओबीसी,प्रभाग क्र १६- ओबीसी महिलाप्रभाग क्र १७- सर्वसाधारण

\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\
इच्छुकांमध्ये सोशल मीडिया वॉर
मोहोळ नगर परिषदेसाठी प्रभाग निहाय आरक्षण सोडत जाहीर झाल्यापासून दिवसभर तसेच रात्री उशिरापर्यंत इच्छुकांची फटाक्यांची आतषबाजी चालू होती. तर काही जणांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. दरम्यान अनेक ठिकाणी आपण उभे राहणार असलेल्या प्रभागाचे क्रमांक टाकून सोशल मीडियावर ती पोस्ट फिरवून स्टेटस ठेवले. त्यामुळे या निवडणुकीमध्ये इच्छुकांची मांदियाळी असणार आहे. तर सर्वच पक्षांपुढे बंडखोरांचे आव्हान कायम राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *