मोहोळ,शहरातील बोगस मतदारांवर४२९ नावावर हरकती

ताज्या घडामोडी सोलापूर

जनसत्य, प्रतिनिधी,

मोहोळ
 नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील बोगस मतदारांवर घेण्यात आलेल्या हरकतींची सुनावणी दि.११ मार्च पासुन तहसिल कार्यालयात सुरू झाली. यात ४२९  नावावर घेण्यात आलेल्या हरकती संदर्भात ४१ मतदारांनी समक्ष उपस्थित राहुन आपल्या पुराव्यासह बाजु मोहोळ तहसिलदार यांच्या समोर मांडण्यात आली .

मोहोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या मतदार यादी मध्ये एकूण मतदारांच्या तुलनेत ५२५५ मतदार वाढल्याचे दिसत असल्याबाबत माजी  नगराध्यक्ष रमेश नागनाथ बारसकर , सतीश क्षिरसागर , गौतम क्षिरसागर , नागनाथ क्षिरसागर,अशोक गायकवाड, दिपक तांबवे , सागर गाढवे , सुनिल गाढवे आदींनी यांसदर्भात तक्रार नोंदविली होती . तहसिलदार जिवन बनसोडे निवडणुक शाखा नायब तहसीलदार राजशेखर लिंबारे यांचे समोर सुनावनी सुरू झाली . यावेळी सुनावनीस उपस्थित राहिलेल्या मतदारांच्या रहिवासी पुराव्या बाबत व इतर कागदपत्रांची खातरजमा करून घेण्यात आली. गैरहजर राहिलेल्या मतदारांची त्यांनी दिलेले रहिवासी पुराव्या वरुन  महसुल यंत्रणेमार्फत खातरजमा करूनच पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती तहसिलदार जिवन बनसोडे यांनी दिली .दरम्यान उपस्थित न राहिलेल्या मतदारांच्या नावाबाबत काय हरकत घेण्यात आले आहेत. याबाबतचा तपशील मिळावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रोहित फडतरे, संतोष सुरवसे, बापू आठवले आदींनी केली.अॅड. गौतम खरात यांनी यादीतील आक्षेप घेण्यात आलेल्या मतदाराच्या नावाबाबत नेमका काय आक्षेप घेण्यात आला आहे .याबाबतची कागदपत्रे  मिळावीत . वरील  कागदपत्रे मिळाल्यानंतर त्याचे अवलोकन करून म्हणणे देण्यासाठी मुदत मिळावी अशी मागणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *