मोहोळ: विवाहितेवर आठ महिने अत्याचार

ताज्या घडामोडी सोलापूर

मोहोळ,(तालुका प्रतिनिधी):

व्हिडिओ रेकॉर्डिंग सार्वजनिक करण्याची धमकी देऊन ३० वर्षीय विवाहितेवर आठ महिने लैंगिक अत्याचार केल्याची घटना बुधवार १९ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. या प्रकरणी एका इसमावर मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जैनुद्दीन लाला शेख (रा. सौंदणे ता. मोहोळ) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

 या बाबत मोहोळ पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मोहोळ तालुक्यातील तांबोळे येथील एक विवाहिता अंघोळ करत असताना, जैनुद्दीन लाला शेख याने लपून मोबाईलमध्ये विडीओ रेकॉर्ड केला होता. त्यानंतर त्याने जानेवारी २०२० मध्ये सदरचा विडीओ त्या विवाहितेला दाखवून तिच्या मनाविरुद्ध बळजबरीने संभोग केला होता. त्यानंतरही त्याने वेळोवेळी सदर विवाहितेस तिचा नवरा व लहान मुलाला जिवे मारण्याची धमकी देवून तब्बल आठ महिने तिच्यावर लैगिंक अत्याचार केले. त्याचा नेहमीचा त्रास सहन न झाल्याने पिडीतेने बुधवार १९ ऑगस्ट फिर्याद दाखल केली. या प्रकरणी सदर पीडितेने मोहोळ पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार जैनुद्दीन लाला शेख याच्या विरोधात बलात्काराचा सह गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सोलापूर ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रभाकर शिंदे हे करीत आहेत

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *