मोहोळ नगरपरिषद वर भाजपा सह रिपाई रासप या मित्र पक्षाचा चा झेंडा फडकवा

ताज्या घडामोडी सोलापूर

जनसत्य, प्रतिनिधी

मोहोळ,
भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा महासागर असून जे येतील त्यांना सोबत घेऊन येणाऱ्या निवडणुकीत नगरपरिषद वर भाजपा सह रिपाई रासप या मित्र पक्षाचा चा झेंडा फडकवा, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे जिल्हा संघटन सरचिटणीस व मोहोळ नगरपरिषद निवडणूक निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी मोहोळ शहर भाजपा च्या प्रमुख पदाधिकारी बैठकीत केले.
मोहन नगर परिषद सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीत या पार्श्वभूमीवर मोहोळ येथे निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या उपस्थिती मध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना चव्हाण म्हणाले की, महाराष्टात ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादी ची सत्ता आहे. त्या त्या ठिकाणी विकासाच्या नावाखाली आणलेल्या निधीतून विकासाचा नव्हे तर भ्रष्टाचाराचा डोंगर उभा केला असून मोहोळ ही त्याला अपवाद नाही. येणाऱ्या निवडणुकीत जे सोबत येतील त्यांना बरोबर घेऊन पक्षाच्या चिन्हावर नगरपरिषद वर सत्ता काबीज करा. भाजप संपूर्ण ताकतीने तुमच्या सोबत आहे, असेही ते शेवटी म्हणाले. भाजप चे तालुका अध्यक्ष सुनील चव्हाण व नगरसेवक सुशील क्षीरसागर यांनी त्यांचा सत्कार केला.
यावेळी भाजप चे तालुका अध्यक्ष सुनील चव्हाण, नगरसेवक सुशील क्षीरसागर, लोकसेवक संजय अण्णा क्षीरसागर, महेश सोवनी, जिल्हा सरचिटणीस सतीश दादा पाटील, सरचिटणीस रमेश माने, शंकरराव वाघमारे, जगन्नाथ वसेकर, मुजीबभाई मुजावर, नवनाथ गाढवे, सागर लेंगरे, विशाल डोंगरे, नवनाथ चव्हाण, अतिक मुजावर, दिनेश गडदे , प्रशांत गाढवे, सुनील गाढवे आदिसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *