मोहोळ शहरात दुकानांना आग, लाखोंचे नुकसान

क्राईम ताज्या घडामोडी सोलापूर

जनसत्य, प्रतिनिधी

मोहोळ
पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला  असणाऱ्या उद्योजक चंद्रकांत वाघमोडे यांच्या मालकीच्या शॉपिंग सेंटरच्या दुकानांना रात्री अकरा वाजता भीषण आग लागली. या आगीत सहा दुकाने जळून खाक झाली असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान लोकनेते शुगरच्या अग्निशामक दल आणि उपस्थित नागरिकांच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आणण्यात रात्री उशिरा यश मिळाले.
कृषी उत्पन्न बाजार समिती च्या शेजारी असलेल्या उद्योजक चंद्रकांत वाघमोडे यांच्या शॉपिंग सेंटरला रात्री अकरा च्या सुमारास अचानक आग लागली. आगीचे व धुराचे लोळ बाहेर पडू लागल्याने ही बाब नागरिकांच्या लक्षात आली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी लोकनेते साखर कारखान्याच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले,तर उपस्थित नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले. या दुर्घटनेत सहा दुकाने जळून खाक झाली असून करोडो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मोहोळ पोलिस प्रशासनाने देखील घटनास्थळी धाव घेतली असून  नेमकी कोणत्या कारणाने आग लागली याचा तपास सुरू केला आहे. दरम्यान आग आटोक्यात आल्याने जवळच असलेले पाईप दुकान आणि लाकडाचा अड्डा   चा आगीपासून बचाव होऊन मोठा अनर्थ टळल्याची चर्चा होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *