थकबाकीपोटी 32 गाळे सील, साडेबारा लाख रुपये वसुल

ताज्या घडामोडी सोलापूर

जनसत्य प्रतिनिधी

मार्च अखेर महानगरपालिकेकडील मिळकत कर वसुलीची मोहीम अधिक तिव्र करण्यात आली आहे. शुक्रवारी थकबाकीपोटी तब्बल 32 गाळे सील केले, तर साडेबारा लाख रुपये वसुल केले असल्याची माहिती शहर कर संकलन प्रमुख प्रदीप थडसरे यांनी दिली. 

    थकबाकी वसुली मोहिम आयुक्त पी. शिवशंकर यांच्या आदेशावरुन व उपायुक्त जमीर लेंगरेकर, सहा. आयुक्त श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत आहे. शुक्रवारी रविवार पेठ व सिव्हिल लाईन पेठ या भागात वसुली मोहिम राबवण्यात आली. विविध थकबाकीदारांकडे थकीत रकमेपोटी 32 गाळे सील केले. तर एकुण 12 लाख 51 हजार 480 रुपये इतकी रक्कम वसुल करण्यात आली. सदरच्या मोहिमेमध्ये कर आकारणी व कर संकलन कार्यालयाकडील एल. एस. दौतुल, चंद्रकांत दोंतुल, कारभारी गायकवाड, मांजरटकर व पेठेतील इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *