मुंबई : अभिनेता शाहिद कपूरची (Shahid Kapoor) पत्नी मिरा राजपूत (Mira Rajput) सिनेसृष्टीत कार्यरत नाही. परंतु चाहत्यांच्या चर्चेत मात्र कायम असते. शाहिदशी लग्न केल्यानंतर रातोरात प्रसिद्धी मिळालेल्या मिराचं फॅन फॉलोइंग आज शाहिदपेक्षाही अधिक आहे. तिचे फोटो आणि व्हिडीओज सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. अलिकडेच तिनं आपल्या चाहत्यांशी गप्पा मारण्यासाठी एक ऑनलाईन लाईव्ह चॅट सेशन केलं होतं. यामध्ये तिला एका चाहत्यानं तुझं पहिलं क्रश कोण होतं? असा सवाल केला. अन् या प्रश्नाचं उत्तम ऐकून तुम्ही देखील व्हाल थक्क
मिरानं इन्स्टाग्रामवर आस्क मी एनिथिंग हे लाईव्ह सेशन केलं होतं. यामध्ये एका नेटकऱ्यानं शाहिद पूर्वी तू कोणाच्या प्रेमात पडली होतीस? तुझं पहिलं क्रश कोण होतं? असे सवाल केले. त्याच्या या प्रश्नावर क्षणाचाही विलंब न करता तिनं दक्षिण आफ्रिकन क्रिकेटपटू ए.बी. डिव्हिलीअर्स (AB de Villiers) हे नाव घेतलं. यापूर्वी देखील अनेक मुलाखतींमध्ये तिनं एबीचं नाव घेतलं होतं. तिला त्याची फलंदाजी करण्याची शैली प्रचंड आवडते. आयपीलमध्ये त्यानं डेल स्टेनच्या एका षटकात चार षटकार मारले होते. तेव्हापासून तिला तो प्रचंड आवडू लागला होता.
मिरा आणि शाहिदनं 2015 साली लग्न केलं. मिरा एक मध्यमवर्गीत कुटुंबातील आहे. तिला पाहताच शाहिद तिच्या प्रेमात पडला अन् त्यानं तिला लग्नासाठी मागणी घातली होती. शाहिद-मिराला दोन मुलं आहेत. मोठ्या मुलीचं नाव मिशा आहे तर लहान मुलाचं नाव जैन असं आहे. मिरा आणि शाहिदमध्ये 13 वर्षांचं अंतर आहे.