IPL 2020 : मुंबईचा सामना हैदराबादशी, रोहितने टॉस जिंकला

क्रीडा ताज्या घडामोडी देशविदेश

शारजाह : आयपीएल (IPL 2020) च्या आजच्या मॅचमध्ये मुंबई (Mumbai Indians)चा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma)ने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. या मॅचसाठी मुंबईने टीममध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. तर दुखापत झाल्यामुळे हैदराबादच्या टीममध्ये भुवनेश्वर कुमारला संधी मिळाली नाही.

पॉईंट्स टेबलमध्ये मुंबईची टीम तिसऱ्या क्रमांकावर आणि हैदराबाद चौथ्या क्रमांकावर आहे. मुंबईने आतापर्यंत खेळलेल्या 4 मॅचपैकी 2 मॅचमध्ये विजय तर 2 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. तर हैदराबादनेही 2 सामने जिंकले आणि 2 गमावले आहेत. हैदराबादने सुरुवातीच्या दोन्ही मॅच गमावल्यानंतर जोरदार पुनरागमन करत पुढचे दोन्ही सामने खिशात टाकले. तर मुंबईने चेन्नईविरुद्धचा पहिला सामना गमावला, यानंतर कोलकात्याविरुद्धच्या मॅचमध्ये त्यांचा विजय झाला. तर बैंगलोरविरुद्धची मॅच सुपरओव्हरमध्ये मुंबईला गमवावी लागली. याआधी पंजाबविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये त्यांचा शानदार विजय झाला.

मुंबईची टीम

रोहित शर्मा, क्विंटन डिकॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड, कृणाल पांड्या, राहुल चहर, जेम्स पॅटिनसन, जसप्रीत बुमराह, ट्रेन्ट बोल्ट

हैदराबादची टीम

डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेयरस्टो, केन विलियमसन, मनिष पांडे, प्रियम गर्ग, अभिषेक शर्मा, अब्दुल समद, राशीद खान, संदीप शर्मा, सिद्धार्थ कौल, टी नटराजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *