‘मेट्रोला मंजुरी मोदींनी दिली, पैसे फडणवीसांनी आणले आणि ट्रायल रनला अजित पवार’

0
52

पुणे: पुणे मेट्रोची पहिली औपचारिक ‘ट्रायल रन’ शनिवारी पहाटे उपमुख्यमंत्रीयांच्या उपस्थितीत पार पडली. भाजपच्या कोणत्याही मोठ्या नेत्याला या कार्यक्रमाचं आमंत्रण नव्हतं. तसंच, कार्यक्रमातील पोस्टरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटोही नव्हता. त्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्षयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पाटील यांनी मेट्रो कंपनीला थेट इशाराच दिला आहे.

पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुणे मेट्रो कंपनीचा पाटील यांनी यावेळी जाहीर निषेध केला. ‘मेट्रो मोदी सरकारनं मंजूर केली. देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडून ११ हजार कोटींचा निधी मिळवून दिला आणि अजित पवारांनी फक्त ट्रायल रन घेतली. कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचा साधा फोटो नाही. तुम्हाला सगळं फुकट हवं आहे का? माझ्या मतदारसंघात कार्यक्रम होऊनही मला आमंत्रण दिलं नाही. मेट्रो कुणाच्या दबावाखाली काम करत असेल तर आम्हीही खूप दबाव आणू शकतो,’ असा इशारा पाटील यांनी दिला. मेट्रोच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलावलेच पाहिजे,’ असंही ते म्हणाले.एमपीएससीच्या माध्यमातून राज्यातील रिक्त जागा भरण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं. मात्र, अद्याप त्याबद्दल कुठलीही हालचाल झालेली नाही. त्यावरून पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. ‘महाविकास आघाडी हे खोटारडे सरकार आहे. अजित पवारांसारखा कार्यक्षम व शब्दाला पक्का माणूस नाही. पण त्यांच्यासारख्या व्यक्तीनं शब्द पाळला नाही मग काय बोलणार?,’ असं पाटील म्हणाले. प्रत्येक बाबतीत महाविकास आघाडी सरकार असं वेळ मारून नेण्याचं काम करतेय. निवडणूक होईपर्यंत हे सगळं चालेल, पण नंतर कळेल. या सरकारला लोक धडा शिकवतील,’ असंही पाटील म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here