सामन्यांना दंडुका;आरोपीला मटणाचे जेवण,मंगळवेढा पोलिसांचे जगावेगळे शासन

क्राईम पंढरपूर


पंढरपूर तालुका पोलिसांत सुमारे चाळीस जणांवर गुन्हा दाखल
पंढरपूर (प्रतिनिधी):
सर्वसामान्य लोकांना संचारबंदीच्या नावाखाली प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी दंडुक्याची भाषा करणाऱ्या पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीकडून मिळणाऱ्या मलाईसाठी मात्र चक्क आरोपीला त्याच्या घरीच पार्टीसाठी नेल्याची घटना सध्या खूपच चर्चेत आहे.आंबे या गावातील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला आरोग्य तपासणीच्या नावाखाली मंगळवेढा येथील सबजेलमधून बाहेर नेऊन पोलिसांनाच मटणाच्या जेवणाचा मोह न अवरल्याने आरोपीच्या घरी नेऊन चक्क मटणाचे जेवण खाऊ घातले.मात्र आरोपीचा कोरोना रिपोर्ट पॉसिटिव्ह आल्याने सर्वत्र चर्चा झाली आणि हा प्रकार उघडकीस आला.   

   पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात शिवाजी बळीराम भोसले यांच्या घरी बोकडाच्या मटणाचे जेवण होते.यासाठी मंगळवेढा सब जेल मधून खुनाच्या गुन्ह्यातील अटक आरोपीला त्याचे पंढरपूर तालुक्यातील आंबे गावातील घरी बेकायदेशीररित्या जेवणासाठी घेऊन आलेले दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह जेवणा करता आलेले गावातील ३० ते ४० जणांवर आज पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक आतुल झेंडे यांनी दिली.      याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी १७ जुलै रोजी आंबे गावातील शिवाजी बळीराम भोसले यांनी बोकडाचे जेवण पार्टीचे आयोजन केले होते.सध्या कोरोना साथीचा आजार सर्वत्र झपाट्याने पसरत असताना तसेच शासकीय नियमाचे उल्लंघन होईल याची माहिती असतानाही जाणीवपूर्वक बोकड कापून जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला. हा कार्यक्रम सकाळी सात ते संध्याकाळी सातपर्यंत सुरू होता.या पार्टीत गावातील ३० ते ४० जण नागरिक उपस्थित होते.त्याचबरोबर मंगळवेढा  सब जेल मध्ये खुनाच्या गुन्ह्याखाली अटक असलेला भाऊ आरोपी तानाजी बळीराम भोसले यास मंगळवेढा पोलीस ठाण्याचे जेलमधील ड्युटीवरील कर्मचारी बजरंग माने व उदय ढोणे यांनी आरोपी आजारी असल्याने त्याला रुग्णालयात नेण्यासाठी बाहेर काढून खाजगी वाहनातून आंबे येथे आरोपीच्या राहते घरी मटनाच्या पार्टीचे जेवण करण्यासाठी आणले व दोन तासाने पुन्हा जेलमध्ये नेले.मात्र त्यानंतर सदर आरोपीचा कोरोना रिपोर्ट पॉसिटिव्ह आल्याने हा प्रकार उघडकीस आला.त्यानंतर सर्वत्र चर्चा झाल्याने मंगळवेढा डीवायएसपी दत्तात्रय पाटील यांनी घटनेचा तपास कौशल्यपूर्ण रित्या करून पाच मिनिटाच्या वैद्यकीय उपचारासाठी लागणारा कालावधी दोन तास कसे लागले याबाबत अधिक चौकशी करून केलेल्या तपासात बोकडाचे मटण जेवणासाठी गेल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस खात्यात राहुन असे कृत्य करून कर्तव्यात कसूर करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचेही अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले आहे.या सर्वांवर पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यातभा द वि कलम १८८,२६९,२७० सह आपत्तीव्यवस्थापन २००५ चे कलम ५१(ब) भारतीय साथीचे रोग प्रतिबंधक कायदा १८९७ कलम ३(१)(अ) महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ प्रमाणे(१)(३) नुसार गुन्हा दाखल  करण्यात आला आहे.  याबाबतची फिर्याद आंबे गावचे तलाठी प्रकाश तानाजी गुजले यांनी दिली असून पुढील तपास पंढरपूर तालुका पोलिस कर्मचारी मोरे हे करीत आहेत.

ReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *