धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर फडणवीसांसोबत मतभेद? चंद्रकांत पाटलांनी केला खुलासा

ताज्या घडामोडी पुणे

पुणे, : राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. मात्र या मागणीवरून भाजपमध्येच मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. या चर्चा खोडून काढत मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून माझ्यात आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात कुठलेही मतभेद नसल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.’धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यावा, अशी आमची मागणी आहे. या मागणीवरून देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात कोणतेही मतभेद नाहीत. पंकजा मुंडे या देखील धनंजय मुंडे यांच्या विरोधातच भूमिका घेतील, याबाबतही माझ्या मनात अजिबात शंका नाही, असंही पाटील म्हणाले.तसंच यावेळी चंद्रकांत पाटील यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणाही केली आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी भाजपचा महिला मोर्चा सोमवारपासून आंदोलन करणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केलं आहे.

पुण्यात चंद्रकांत पाटलांची पत्रकार परिषद, जाणून घ्या ठळक मुद्दे :

– पवारांनी आरोपांची तात्काळ दखल घेतली, पण त्यांनी दुसऱ्याच दिवशी भूमिका बदलून भ्रमनिरास केला.- रेणू शर्मांची चौकशी जरूर करा पण करूणाचं काय? ती माहिती इतके दिवस का लपवली? या मुद्यावरून तरी धनंजय मुंडे राजीनामा देणार की नाही?.- आत्तापर्यंत ज्या नेत्यांवर लैगिक शोषणाचे आरोप झाले त्या सर्वांनी राजीनामे दिले आहेत. मग मुंडे यांना वेगळा न्याय का?.- नैतिकता या मुद्यावर त्यांनी राजीनामा द्यावा.- मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी सोमवारपासून भाजपचा महिला मोर्चा आंदोलन करणार आहे.- मुंडे यांच्या राजीनाम्यावर फडणवीस आणि भाजपचं म्हणणं एकच आहे.- करूणा शर्मा यांच्या मुद्यावरून तरी राजीनामा हा झालाच पाहिजे, रेणू शर्मा यांची खुशाल चौकशी करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *