‘मला अशा मुलाशी लग्न करायचे जो…’; जान्हवीने सांगितला बॅचलरेट पार्टीपासून लग्नापर्यंतचा प्लॅन

0
70

जान्हवी कपूर बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. जान्हवीचे लाखो चाहते आहेत. त्यात आपल्या आवडत्या कलाकाराच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा ही प्रत्येक चाहत्याला असते. जान्हवीच्या हातात अनेक प्रोजेक्ट्स असले तरीही ती तिच्या खासगी आयुष्याकडे दुर्लक्ष करत नाही. जान्हवीने तर आतापासून तिच्या लग्नाची तयारी करायला सुरुवात केली आहे.

जान्हवीने नुकतीच ‘पिकॉक मॅग्झिन’ला मुलाखत दिली या मुलाखतीत तिने लग्ना विषयी प्लॅनिंग बद्दल सांगितले आहे. जान्हवीने तिच्या बॅचलरेटपासून तिच्या लग्नापर्यंत सगळ्या गोष्टी ठरवल्या आहेत. जान्हवीला साधेपणाने लग्न करायचे आहे. तिच्या लग्नाचा सोहळा जास्त दिवसांचा नसला पाहिजे, फक्त दोन दिवसांत सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे, असे जान्हवीने सांगितले.जान्हवीची बॅचलरेट पार्टी ही कॅप्री किंवा यॉटवर असेल. मेहेंदी आणि संगीतचा कार्यक्रम हा मयलापुरमध्ये तिची आई आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीच्या घरी असेल. तर लग्न हे तिरुपतीत करण्याची जान्हवीची इच्छा आहे. जान्हवीला रिसेप्शन ठेवण्याची इच्छा नाही. तर लग्नाच्या डेकोरेशनबद्दल जान्हवी म्हणाली की, तिला साधेपणा आणि पारंपारिक पाहिजे, तर मोगरा आणि मेणबत्त्यांची सजावट असली पाहिजे. जान्हवी तिच्या लग्नात कांजीवरम साडी नेसेल. तर ब्राइड्समेड म्हणून बहिण खुशी, अंशुला आणि तिची जवळची मैत्रिण तनिषा असेल, असे ती म्हणाली आहे. तर नवरदेव कसा असेल असा प्रश्न विचारता जान्हवी म्हणाली, ‘आशा आहे की एक समजूतदार माणूस असेल कारण मी अजून अशा व्यक्तीला भेटली नाही.’जान्हवीने २०१८ मध्ये ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ‘गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल’मध्ये जान्हवी मुख्य भूमिकेत दिसली होती. ‘गुंजन सक्सेना’ चित्रपटामुळे जान्हवीला खरी लोकप्रियता मिळाली होती. तर आता जान्हवी ‘गुड लक जेरी’ आणि ‘दोस्ताना २’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here