पोलीस भरती प्रक्रिया थांबवा; अन्यथा उग्र आंदोलन, मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा

ताज्या घडामोडी मुंबई

मुंबई : राज्य सरकानं पोलीस भरतीची प्रक्रिया जाहीर केल्यानंतर मराठा क्रांती ठोक मोर्चानं आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्यापही पूर्णपणे मार्गी लागलेला नसल्यानं ही आक्रमक भूमिका घेतली आहे. आरक्षणाचा प्रश्न सुटल्याशिवाय कुठलीही भरती नको अशी विनंती करून देखील राज्य सरकानं पोलीस भरती सुरू केल्यानं हा निर्णय घेतल्याचं मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

विनंती करून देखील राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयावर मराठा क्रांती ठोक मोर्चा नाराज असून आता आंदोलनाचं हत्यार उगारणार असल्याचा थेट इशारा देखील मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक अमित घाडगे यांनी परळी इथे दिला.

अमित घाडगे म्हणाले की, ”राज्य सरकार ज्या पध्दतीने निर्णय घेत आहे त्यावरून आम्हाला वाटायला लागल आहे की सरकारची इच्छा असावी की मराठा समाजाने हे राज्य सोडून अन्य कोठे जावे. तसे असेल तर सरकारने मराठा समाजाला सांगावे. 25 जानेवारीपासून मराठा आरक्षणावर नियमित सुनावणी आहे. असं असताना देखील राज्य सरकारने एवढ्या घाईत भरती प्रक्रिया करण्याचा निर्णय घेणे म्हणजे, सरकारला सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकवायचा नाही, असं आम्हाला वाटायला लागलं आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या भरती तात्काळ थांबावावी अन्यथा आता उग्र आंदोललाना शिवाय दुसरा पर्याय मराठा समाजला नाही.”

मराठा क्रांती ठोक मोर्चानं दिलेल्या या इशाऱ्यानंतर आता राज्य सरकार पोलीस भरती प्रक्रिया थांबवणार का? किंवा भरती प्रक्रियेवर काय उत्तर देणार हे पाहाणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. तर 25 जानेवारीपासून होणाऱ्या मराठा आरक्षणाच्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष देखील लागलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *