नियमाचे उल्लंघन केल्यास कोरोना संपुष्टात येईपर्यंत आस्थापना बंद-मनपा आयुक्तांकडून पुन्हा कडक निर्बंध जरी

ताज्या घडामोडी सोलापूर

मालकविरुद्ध दंडात्मक कारवाई व गुन्हे होणार दाखल-सर्व भाजीपाला विक्रेत्यांना 7 दिवसात टेस्ट करणे बंधनकारक

जनसत्य प्रतिनिधी

शहरातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आयुक्त पी. शिवशंकर यांनी 7 मार्च नंतर आज, शुक्रवारी पुन्हा कडक निर्बंध जारी केले आहेत. सर्व भाजीपाला विक्रेत्यांना 7 दिवसात टेस्ट करणे बंधनकारक आहे. सिनेमगृहे, हॉटेल, रेस्टॉरंट आदि सर्व आस्थापना यांनी नियम मोडल्यास संबंधीत आस्थापना कोरोना संपुष्टात येईपर्यंत बंद ठेवण्यात येईल. तसेच मालकावर दंडात्मक कारवाई करून गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी आदेशात म्हटले आहे. त्यामुळे सर्वांनी नियम पाळण्याचे आवाहन यावेळी केले आहे.       गृह विलगिकरणाला परवानगी दिली असली तरी खासगी वैदयकीय अधीकारी नेमणे गरजेचे आहे. तसेच वेळोवेळी महापालिकेच्या आरोग्य विभागाला माहिती कळवणे बंधनकारक असणार आहे. जीवनाश्यक वस्तु दूध, भाजीपाला, फळे, वृत्तपत्र सेवा व अत्यावश्यक सेवा पुरवणारे आस्थापना, व्यक्तींना व त्यांच्या वाहनांना यातून वगळण्यात आले आहे. सर्व अभ्यासिका, ग्रंथालय हे शासकीय नियम पाळून 50 टक्के उपस्थिती सुरक्षित अंतर व नियम काटेकोरपणे पाळून सुरु राहील. मंगल कार्यालय, लॉन कार्यक्रमास ५० लोकांच्या उपस्थिती. लग्नासाठी पोलिस विभागाची ना-हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक राहील. अंत्यविधी साठी 20 लोकांना परवानगी. सर्व हॉटेल, रेस्टॉरंट व बार रात्री 11 वाजेपर्यंतच सुरु राहतील. सदर आस्थापनामधील उपस्थिती क्षमतेच्या ५० % पर्यंत मर्यादित राहील. प्रतिबंधीत क्षेत्र वगळता उर्वरीत क्षेत्रातील धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे सुरु करणेच्या अटी व शर्तीवर परवानगी देण्यात आलेली आहे. परंतु कोविड 19 च्या प्रार्दुभावाच्या अनुषंगाने यात्रा, उत्सव, उरुस, वारी इत्यादीचे आयोजन करण्यास बंदी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *