जप्तीचे सील उघडल्याने व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल-उपायुक्त जमीर लेंगरेकर यांची माहिती

ताज्या घडामोडी सोलापूर

जनसत्य प्रतिनिधी सोलापूर

महानगरपालिकेने शहर हद्दवाढ विभाग, अक्कलकोट रोड येथील जगदाळे असोशिएटचे प्रो. ए. एच. जगदाळे, सृष्टी नगर, सोलापूर यांच्या मिळकतीचे मालमत्ता करापोटी 56 लाख 55 हजार 588 रुपये थकबाकीपोटी मालमत्ता सील केली होती. परंतु सील केलेली मालमत्ता परस्पर उघडल्याने संबंधित व्यापाऱ्यावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात कर निरीक्षक चंद्रकांत लक्ष्मण दोंतुल यांनी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी शनिवारी दिली.

      शहर हद्दवाढ विभाग, अक्कलकोट रोड, मिळकत क्रमांक -581864, मे जगदाळे असोशिएटचे प्रो. ए. एच. जगदाळे, सृष्टी नगर, सोलापूर यांचे नावे मिळकत नोंद असून सदर मिळकतीचे मालमत्ता करापोटी मार्च-2021 56 लाख 55 हजार 588 रुपये इतकी रक्कम येणे आहे. परिणामी महापालिका प्रशासनाने संबंधितांना नोटीस दिल्यानंतरही थकबाकी भरली नसल्याने मालमत्ता सील केली होती. तसेच सदरची मिळकत जाहीर लिलाव करून मालमत्ता कराची वसुली करण्याबाबत लेखी आदेश दिले होते. जप्ती प्रक्रियेवेळी जागेचा प्रत्यक्षात वापर पडसलगी टेक्सटाईल्स शोरूमचे मालक चंद्रशेखर पडसलगी, प्रकाश पडसलगी आणि प्रभु पडलसगी करीत असलेले दिसुन आले. सदरची बाब उपायुक्त जमीर लेंगरेकर व आयुक्त पी. शिवशंकर यांच्या निदर्शनास दिली. परिणामी  मिळकतदारांनी आयुक्तांच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे व अनाधिकाराने सील उघडले म्हणून IPC 188 व 447 नुसार एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

.———-\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\

थकबाकी भरून कारवाई टाळा-महानगर पालिकेच्या मालमत्ता कराची थकबाकी भरून अभय योजनेचा लाभ घ्यावा. थकबाकी भरून कारवाई टाळा, अन्यथा जप्तीच्या कटू कारवाईस अपरिहार्यपणे सामोरे जावे लागेल.-

जमीर लेंगरेकर, उपायुक्त, मनपा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *