सोलापूर (प्रतिनिधी)
महाराष्ट्र शासनाने पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा धडाका सुरू केला आहे. यापूर्वी काही ोलिस अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या आज पुन्हा 27 अधिकाऱ्याच्या बदल्या करण्यात आले आहेत. यामध्ये सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची अहमदनगर येथे पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे मात्र सोलापूर येथे पोलीस अधीक्षक म्हणून कोण येणार या बाबत मात्र सस्पेन्स कायम ठेवण्यात आला आहे.
मोहित कुमार गर्ग गडचिरोली येथून रत्नागिरी, विक्रम देशमाने मुंबई येथून ठाणे ग्रामीण, राजेंद्र दाभाडे मुंबई येथून सिंधुदुर्ग, सचिन पाटील मुंबई येथून नाशिक ग्रामीण, मनोज पाटील सोलापूर येथून अहमदनगर, प्रवीण मुंडे रत्नागिरी येथून जळगाव, अभिनव देशमुख कोल्हापूर येथून पुणे ग्रामीण, दिक्षित कुमार गेडाम सिंधुदुर्ग येथून सांगली येथे, शैलेश बलकवडे गडचिरोली येथून कोल्हापूर येथे, विनायक देशमुख मुंबई येथून जालना, राजा रामास्वामी मुंबई येथून बीड, प्रमोद शेवाळे ठाणे शहर येथून नांदेड, निखिल पिंगळे नागपूर येथून लातूर ,जयंत मीना परभणी, राकेश कलासागर मुंबई येथून हिंगोली ,वसंत जाधव मुंबई शहर येथून भंडारा ,प्रशांत होळकर अमरावती शहर येथून वर्धा, अरविंद साळवे भंडारा येथून चंद्रपूर ,विश्वा पानसरे नागपूर येथून गोंदिया, अरविंद चावरिया औरंगाबाद येथून बुलढाणा, विखे पाटील बुलढाणा येथून यवतमाळ ,अंकित गोयल मुंबई येथून गडचिरोली अशा 22 पोलीस अधीक्षकांच्या या बदल्या करण्यात आल्या आहेत.
त्याचबरोबर संजय बाविस्कर उपमहानिरीक्षक पुणे नवीनचंद्र रेड्डी अप्पर पोलीस आयुक्त नागपूर, दिलीप झळके औरंगाबाद येथून नागपूर अप्पर पोलीस आयुक्त, जालिंदर सुपेकर पुणे येथून अप्पर पोलीस आयुक्त प्रशासन पुणे ,ॲम्बी तांबडे संचालक आणि पोलीस उपनिरीक्षक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई या प्रकारे बदल्या करण्यात आले आहेत.
आणखी काही अधिकाऱ्यांच्या या बदल्या करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले
