प्रभाससोबत काम करण्यासाठी दीपिका घेणार 20 कोटी मानधन?

मनोरंजन

बॉलिवूडची मस्तानी, अभिनेत्री दीपिका पदूकोण लवकरच दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या चित्रपटामध्ये झळकणार आहे. तिन दिवसांपूर्वीच प्रभासने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर त्याच्या आगामी चित्रपटात दीपिका पदूकोण मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची अधिकृत घोषणा केली. पण सुपरस्टार प्रभाससोबत काम करण्यासाठी दीपिका किती मानधन घेणार हे जाणून घेण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत.
प्रभास या चित्रपटासाठी 50 कोटी रुपये मानधन घेणार आहे. तर दीपिका या चित्रपटात काम करण्यासाठी 20 कोटी रुपये मानधन घेणार आहे. या चित्रपटाच्या मानधनानंतर दीपिका भारतीय चित्रपटसृष्टीमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली असल्याचे म्हटले जात आहे.
या चित्रपटाचे नाव अद्याप समोर आलेले नाही. तेलुगू चित्रपटसृष्टीमधील सर्वात मोठी चित्रपट निर्मिती करणारी कंपनी ङ्गवैजयंती मूव्हीजङ्ख या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. या कंपनीला 50 वर्षे पूर्ण होत असल्यामुळे चित्रपटाचे बजेट जास्त असल्याचे म्हटले जात आहे. तसेच हा चित्रपट वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. प्रभासच्या करिअरमधला हा एकविसावा चित्रपट आहे. आता दीपिका आणि प्रभासला एकत्र पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *